Pune Crime News | मोक्क्याच्या गुन्ह्यात दिड वर्षापासुंन फरार असणारा सराईत शशांक चव्हाण जेरबंद : चतुःश्रृंगी पोलीसांची कामगिरी
Pune Crime News
पुणे, दि. ११ सप्टेंबर, महाराष्ट्र मिरर
मुबारक जिनेरी
पीएमसी कॉलनी, पांडवनगर येथे गाड्यांची तोडफोड करून फिर्यादींना कोयत्याने मारहाण केल्याप्रकरणी दाखल मोक्का गुन्ह्यात दिड वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा सराईत आरोपी शशांक चव्हाण याला जेरबंद करण्यात चतुःश्रृंगी पोलीसांना यश आले आहे. सदर कामगिरी पोलीस उप-आयुक्त परिमंडळ-४ हिंम्मत जाधव, सहायक पोलीस आयुक्त खडकी विभाग अनुजा देशमाने, यांचे मार्गदर्शनाखाली चतुःश्रृंगी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) युवराज नांद्रे, तपास पथकाचे अधिकारी, पोलीस उप-निरीक्षक प्रणिल चौगले यांनी केली आहे. Pune Crime News
सराईत आरोपी शशांक चव्हाण याच्याकडून फिर्यादीसोनु सुनिल अवघडे, वय-२५ वर्ष, धंदा-रिक्षा चालक,रा-बिल्डींग नं.०१, पीएमसी कॉलनी, पांडवनगर पुणे यांना कोयत्याने मारहाण करुन जखमी केले होते. याबाबत चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन, पुणे शहर, गु.र.नं. २७३/२०२३ भादवि कलम- ३०७,४२७, ३२३,५०४, ५०६(२),१४३, १४७,१४८,१४९, आर्म अॅक्ट ४ (२५), फौजदार सुधारणा कायदा- २०१३ चे कलम ७, महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) सह १३५, महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे कलम ३ (१) (ii) ३(२), ३ (४) प्रमाणे गुन्हा दाखल होता. सदर गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी पोलिसांना गुंगारा देत होता.
मोक्का गुन्हयाचा तपास सहायक पोलीस आयुक्त खडकी विभाग करीत असुन त्यामधील पाहिजे आरोपी याचा शोध घेणेबाबत त्यांनी दिलेल्या सुचनेप्रमाणे तपास पथकातील अधिकारी व अंमलदार हे शोध घेसताना तपास पथकातील अधिकारी प्रणिल चौगले, पोलीस उप-निरीक्षक, यांनी त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फत माहिती प्राप्त करुन यातील पाहिजे आरोपी नामे शशांक आनंद चव्हाण, वय-२४ वर्ष, रा-रुम नं.०४, बिल्डींग नं. २२, कावेरीनगर वाकड पुणे. याचा स्टाफसह शोध घेवुन त्यास महादेव कॉलनी, गुजरनगर, डांगे चौक या ठिकाणावरुन शिताफीतीने ताब्यात घेवुन त्यास दाखल गुन्हयात अटक करुन उत्तम कामगिरी केली.
सदरची कामगिरी ही Pune Police पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर, मनोज पाटील, पोलीस उप-आयुक्त परिमंडळ-०४ पुणे शहर हिंम्मत जाधव, सहायक पोलीस आयुक्त खडकी विभाग, पुणे शहर अनुजा देशमाने, यांचे मार्गदर्शनाखाली चतुःश्रृंगी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) युवराज नांद्रे, तपास पथकाचे अधिकारी, पोलीस उप-निरीक्षक, प्रणिल चौगले, पोलीस हवालदार/श्रीकांत वाघवले, पोलीस हवालदार/बाबुलाल तांदळे, पोलीस हवालदार / सुधाकर माने, पोलीस हवालदार/इरफान मोमीन, पोलीस हवालदार/बाबासाहेब दांगडे पोलीस हवालदार/श्रीधर शिर्के यांनी केली आहे.