Nagpur Audi Accident : भाजप प्रदेशाध्यक्ष मुलगा गाडीत होता? नागपूर रस्ते अपघाताबाबत उद्धव ठाकरे गटच्या नेत्यांनी गंभीर आरोप केले
Nagpur Audi Accident : काल नागपुरात एका ऑडी कारने अनेक वाहनांना धडक दिली. ही कार भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाच्या नावावर आहे. आता उद्धव ठाकरे गटाने याबाबत गंभीर आरोप केले आहेत.
मुंबई :- नागपुरात काल झालेल्या Nagpur Audi Accident भीषण अपघातात एका आलिशान ऑडी कारने अनेक वाहनांना धडक दिली. ही कार भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे Chandra Shekar Bawankule यांचा मुलगा संकेत याच्या नावावर नोंदणीकृत आहे, ज्याला खुद्द बावनकुळे यांनी दुजोरा दिला आहे. (Nagpur Audi Accident) या घटनेनंतर राजकीय पेच वाढला असून विरोधकांनी भाजपवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे.
या अपघाताबाबत शिवसेनेच्या उपनेत्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) एक्स वर सुषमा अंधारे Sushma Andhare यांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत.नागपूर hit &run केसमधील फिर्यादी जितेंद्र सोनकांबळे यांची सुरक्षितता अतिमहत्त्वाची आहे.
दुसरी महत्त्वाची बाब संकेत बावनकुळे आणि त्याचे 3 साथीदार ज्या लाहोरी बारमध्ये मद्यपान करत होते त्या बार आणि आसपासचे CCTV फुटेज तात्काळ हस्तगत करायला हवेत.
या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. पोलिसांनी अर्जुन हावरे आणि रोहित चिंतामवार यांच्याविरुद्ध बेदरकारपणे वाहन चालवल्याचा गुन्हा दाखल केला आहे. चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याने हा अपघात झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
नागपूरच्या रामदासपेठमध्ये झालेल्या या अपघातात पोलिसांनी गाडीचा नंबर का नोंदवला नाही, गाडी मालकांवर योग्य कारवाई का केली नाही, असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे. त्यांनी थेट संकेत बावनकुळे यांच्यावर आरोप केला की, अपघाताच्या वेळी तो गाडीत उपस्थित होता.यासोबतच त्यांनी फिर्यादी जितेंद्र सोनकांबळे यांच्या सुरक्षेची मागणी केली असून संकेत व त्याचे तीन मित्र ज्या बारमध्ये दारू पीत होते तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे आवाहनही त्यांनी केले.
भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी या घटनेत सहभागी असलेली कार आपल्या मुलाच्या नावावर असून पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. याप्रकरणी पोलिसांनी संकेत बावनकुळे याचीही चौकशी केली आहे, मात्र आतापर्यंतच्या तपासानुसार अर्जुन हावरे हा अपघाताच्या वेळी गाडी चालवत होता, तर संकेत कारमध्ये उपस्थित नव्हता.