मुंबई

Sanjay Raut : संजय राऊत यांचा शिवसेना शिंदे गटावर मोठा आरोप, ‘एकीकडे त्यांचे आमदार बुरखे घालतात तर दुसरीकडे…’

Sanjay Raut Target Eknath Shinde Shivsena : उद्धव गटाचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे गटातील शिवसेनेवर निशाणा साधला आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या एका आमदाराने महाराष्ट्रात बुरख्या वाटपाबाबत पोस्टर लावले होते.

मुंबई :- एकनाथ शिंदे Eknath Shinde यांची शिवसेना मुस्लिम महिलांना बुरख्याचे वाटप करत आहे. शिवसेना मुस्लिम महिलांना बुरख्याचे वाटप करण्याची ही पहिलीच वेळ आहे. याबाबत मुंबईतील भायखळा परिसरात अनेक ठिकाणी होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत. शिंदे गटाच्या आमदार यामिनी जाधव Yamini Jadhav यांनी हे होर्डिंग्ज लावले आहेत. आता शिवसेनेच्या या निर्णयावर उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत Sanjay Raut यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

खासदार संजय राऊत यांनी एका म्हटले आहे की, पक्ष सोडून गेलेल्या आमदारांनाही बुरखा घालायला हवा कारण येत्या निवडणुकीत त्यांना बुरख्यातच जनतेला सामोरे जावे लागेल, नाहीतर लोक त्यांना जोडे मारतील. त्यांनी या आमदारांना ढोंगी संबोधले आणि हे लोक निवडणूक जिंकण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात, असे त्यांनी सांगितले.हे लोक बुरख्याचे वाटप करत असताना दुसरीकडे त्यांचे नेते शाळा-महाविद्यालयांमध्ये बुरखा घालण्यास विरोध करत आहेत, असा विरोधाभास राऊत यांनी निदर्शनास आणून दिला. Maharashtra Latest Political Update

दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातुन South Mumbai Lok Sabha यामिनी जाधव या भागातून निवडणूक पराभूत झाल्या होत्या, कारण हा मुस्लिमबहुल परिसर मानला जातो. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी मुस्लिम मतदारांना आकर्षित करण्यासाठी असे कार्यक्रम आयोजित केले जात असून शिवसेनेकडून मुस्लिम महिलांना बुरख्याचे वाटप करण्यात येत असल्याचे चित्र आहे.यंदाच्या लोकसभा निवडणुकीत यामिनी जाधव या भागातून पराभूत झाल्या होत्या, कारण हा मुस्लिमबहुल भाग मानला जातो. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी मुस्लिम मतदारांना आकर्षित करण्यासाठी असे कार्यक्रम आयोजित केले जात असून शिवसेनेकडून मुस्लिम महिलांना बुरख्याचे वाटप करण्यात येत असल्याचे चित्र आहे. Maharashtra Latest Political Update

राऊत यांनी गृहमंत्री अमित शहा यांचाही समाचार घेत लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी देशभरातून लोक येतात, पण सोने, चांदी किंवा इतर देणग्या देवाची प्रतिष्ठा वाढवत नाहीत तर लोकांची श्रद्धा देवाला महान बनवते.भाजपचे नेते महाराष्ट्रातून उद्योग आणि व्यापार गुजरातमध्ये घेऊन जात असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली आणि लालबागच्या राजाचा उत्सवही गुजरातमध्ये जाण्याची शक्यता असल्याचा टोला त्यांनी लगावला. Maharashtra Latest Political Update

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0