Daund Police News : वर्गणीसाठी जबरदस्ती केल्यास खंडणीचा गुन्हा दाखल करणार : पोलिस निरीक्षक नारायण देशमुख
दौंड, ता. 9 गणेशोत्सवात वर्गणीला Ganpati Festival जबरदस्ती करू नका, केल्यास खंडणीचा Daund Extortion News गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा यवत पोलिस स्टेशनचे Yawat Police Station पोलिस निरीक्षक नारायण देशमुख यांनी गणेशोत्सव मंडळांना दिला. दरम्यान गणेशोत्सवात मंडळांनी आक्षेपार्ह देखावे साजरा करु नये. समाजातील धार्मिक सलोख्याचे दर्शन घडेल,असा उत्सव साजरा करुन समाजात आदर्श निर्माण करावा असे मतही त्यांनी व्यक्त केले. यवत पोलीस स्टेशनमध्ये गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी पोलिस निरीक्षक नारायण देशमुख यांनी यवत पोलीस स्टेशन हद्दीतील गणेशोत्सव मंडळ अध्यक्षांच्या उपस्थितीत आयोजित बैठकीत ते बोलत होते. Daund Latest Police News
यावेळी देशमुख यांनी गणेशोत्सव मंडळांनी पारंपरिक वाद्यांचा वापर करावा, मिरवणूक मागे पुढे घेण्यावरून वाद करु नये, वर्गणीला जबरदस्ती करू नका. तक्रार आल्यास खंडणीचा गुन्हा दाखल केला जाईल. गणपती स्टेजने वाहतुकीला अडथळा होऊ नये, वीजजोडणी महावितरणकडून घ्यावी, शक्य झाल्यास शाडूच्या मूर्ती वापरा, प्लास्टिकचा वापर टाळा, ध्वनी प्रदुषण टाळा सर्वोच्च न्यायालयाच्या नियमाचे पालन करा. अनोळखी वस्तू व व्यक्ती बाबत दक्ष राहावे, आपणही सिव्हिल ड्रेसमधील पोलिस आहोत, सजग राहून अनुचित प्रकार टाळा, पोलिसांच्या सुचनांचे पालण करा, अशा सूचना यावेळी केल्या. दरम्यान गणेशोत्सव मंडळांना सार्वजनिक गणपतीजवळ सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत, चोवीस तास स्वयंसेवक उपस्थित राहतील, याची काळजी घ्यावी. श्रींची स्थापना मिरवणूक, विसर्जन मिरवणुकीत पारंपारिक वाद्यांचा वापर करणे बंधनकारक आहे. गणेश मूर्तींची उंची मर्यादित ठेवावी, असे आवाहन त्यांनी केले. Daund Latest Police News