Thane Drug Party Busted By Thane Police : अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई ; तब्बल 90 लाख 20 हजार किंमतीचा 476 ग्रॅम वजनाच्या एमडीएमए अंमली पदार्थ जप्त
ठाणे :- विद्यार्थी आणि व्यावसायिकांना पार्टी ड्रग्ज पुरवणाऱ्या दोघांचा Thane Drug Supplier भंडाफोड करण्यात आला असून दोन तस्करांना अटक करण्यात आली होती. Thane Police Arrested Drug Supplier त्यांच्याकडून 95 लाख वीस हजार किंमतीचा अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.तबरेज अबुजाफर बक्षी,( रा. घासकोपरी, विरार) याला याप्रकरणी अटक केली आहे. त्याच्याकडून पोलिसांनी एमडीएमए 476 ग्रॅम वजनाचा अंमली पदार्थ जप्त केला आहे. तसेच या अमली पदार्थाचा जास्त करून एमडीएमए हे पार्टी ड्रग्ज असुन ते Ecstasy/ Molly या नावाने देखील ओळखले जात असल्याचे सांगितले जात आहे. Thane Drug Rev Party Raid तसेच त्याचा वापर रेव्ह पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणावर केला जात असतो. Thane Latest Drug Racket Busted News
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस हवालदार हुसेन तडवी यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे मुंब्रा शहरातील फॉर्च्यून वाईट अपार्टमेंट समोर वाय जंक्शन ब्रिज जवळील ठाणे कडे जाणाऱ्या रस्त्यावर तबरेज अबूजाफर बक्षी याच्या संशयित हालचालींवरून पोलिसांनी त्याच्याकडे अंमली पदार्थ असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे पोलिसांनी त्याच्याजवळून 476 ग्रॅम वजनाचा 95 लाख 20 हजार रुपये किमतीचा एमडीएमए अंमली पदार्थ हस्तगत करण्यात आला आहे. तसेच हा अंमली पदार्थ कुठून आणला याबाबत तपास केला असता हा अंमली पदार्थ राजस्थानमधील रहिवासी असलेला त्याचा साथीदार एजाज शेर खान उर्फ पठाण, (रा. साकरीया प्रतापगढ, वर्मडल, राजस्थान) यास विरार येथील एका हॉटेल येथून अटक करण्यात आलेली आहे. यापूर्वी देखील दोन्ही आरोपींवर मुंबई पोलीस आयुक्तालयात अंमली पदार्थ विक्रीबाबतचे गुन्हे दाखल आहेत. या दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली असून आरोपींच्या विरुद्ध मुंब्रा पोलीस ठाण्यात एन डी पी एस कायदा अंतर्गत कलम 8(क),22(क),29 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुन्हयाचा पुढील तपास अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र निकम हे करीत आहेत. Thane Latest Drug Racket Busted News
पोलीस पथक
अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, ठाणे डॉ. पंजाबराव उगले, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, ठाणे शिवराज पाटील,सहाय्यक पोलीस आयुक्त, (प्रतिबंध) धनाजी क्षिरसागर यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल मस्के, सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश गावीत, पोलीस उप निरीक्षक दिपेश किणी, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र निकम, पोलीस हवालदार शिवाजी वासरवाड, हेमंत महाले, महेश साबळे, हुसेन तडवी, पोलीस नाईक अनुप राणे, महिला पोलीस हवालदार शिल्पा कसबे, कोमल लादे यांचे पथकाने केलेली आहे.