Mumbai Drug Racket Busted : मुंबईत अंमली पदार्थ विरोधी पथक यांची धडक कारवाई, 23 किलो गांज्यासह 6 लाखाचा मुद्देमाल हस्तगत
Mumbai Ghatkopar Police Busted Drug Racket : अंमली पदार्थ विरोधी पथकाची छापेमारी गोवंडीत 2130 नायट्रावेट टॅबलेटसह सहा लाख रोकड जप्त, गोरेगाव परिसरातून 23 किलो गांजा जप्त
मुंबई :- मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी Mumbai Anti Narcotics Police पथकाने दोन ठिकाणी छापेमारी करत लाखो रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले आहे. मुंबईत गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. शहरात कोणत्याही प्रकारे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ नये. याकरिता पोलिसांकडून विशेष मोहीम राबविण्यात आली आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या पोलिसांनी गोवंडी आणि गोरेगाव परिसरात छापेमारी करत अंमली पदार्थ जप्त केले आहे. Mumbai Latest Crime News
अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या घाटकोपर युनिटने गोवंडी परिसरात छापेमारी करत 2130 अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे घाटकोपर युनिटने अवैधपणे नायट्रावेट टॅबलेटची विक्री करणाऱ्या महिलेस ताब्यात घेतले. तिचे ताब्यातून एकूण 2130 नायट्रावेट टॅबलेट किंमत अंदाजे रूपये 3 लाख 47 हजार 100 रूपये किंमतीचे अंमली पदार्थासह 6 लाख रूपये रोख रक्कम मिळून आल्याने, तिचेविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. नमूद गुन्हयाचा पुढील तपास घाटकोपर युनिट करत आहे. Mumbai Latest Crime News
अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे कांदिवली युनिटने गोरेगांव, मुंबई परिसरात गस्तीदरम्यान अवैधपणे विक्री करीता आणलेला गांजा हा अंमली पदार्थ जवळ बाळगणाऱ्या एका तस्करांस ताब्यात घेतले. त्यांचे ताब्यातून एकूण 23 किलो वजनाचा गांजा किंमत एकूण 5.72 लाख रूपये किंमतीचा अंमली पदार्थ मिळून आल्याने, आरोपीविरोधात कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी या संपूर्ण कारवाईत एकूण 9.19 लाख मुद्देमाल आणि सहा लाख रुपये रोख रुपयांची जप्त केले असून या कारवाई एक महिला आरोपी आणि दोन आरोपींना अटक केली आहे. Mumbai Latest Crime News
पोलीस पथक
विवेक फणसाळकर, पोलीस आयुक्त, Mumbai CP Vivek Phansalkar बृहन्मुंबई, देवेन भारती, विशेष पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई, लखमी गौतम, पोलीस सह आयुक्त (गुन्हे), शशि कुमार मीना, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), शाम घुगे, पोलीस उप आयुक्त, अंमली पदार्थ विरोधी कक्ष, गुन्हे शाखा, मुंबई, सुधीर हिरडेकर, सहाय्यक पोलीस आयुक्त, अंमली पदार्थ विरोधी कक्ष, गुन्हे शाखा, मुंबई यांचे मार्गदर्शनाखाली अं.प.वि. कक्ष, गुन्हे शाखा, घाटकोपर युनिटचे प्रभारी पोलीस निरीक्षक भगवान बेले, कांदिवली युनिटचे प्रभारी पोलीस निरीक्षक वैभव धुमाळ यांचे नेतृत्वाखाली करण्यात आली आहे.