Kalwa Chain Snatcher : कळवा पोलिसांची कामगिरी ; सोनसाखळी चोरट्याच्या मुसक्या आवळल्या
Kalwa Police Arrested Chain Snatcher : कळवा पोलिसांनी 20 वर्षीय सराईत गुन्हेगाराला अटक, आरोपी अट्टल चोर
कळवा :- दिवा शीळ रोड मुंब्रा, ठाणे येथे मयूर वाईन शॉप Kalwa Thane News च्या समोर एका व्यक्तीच्या गळ्यातील सोन्याची चैन जबरीने खेचून फरार Chain Snatcher Kalwa झालेल्या एका वीस वर्षीय सराईत गुन्हेगार असलेल्या आरोपीला कळवा पोलिसांनी अटक Kalwa Police Station केली आहे. आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर अनेक सोनसाखळीचे गुन्हे दाखल आहे. कळवा पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध मुंब्रा पोलीस ठाण्यात बी एन एस अधिनियमन 2023 चे कलम 309 (4) प्रमाणे गुन्हा दाखल आहे. Thane Latest Crime News
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक उत्तेकर यांच्या आदेशाने गुन्हे शोध पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सागर सांगवे आणि तपास पथकातील अंमलदार असे कळवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना एक संशयित आरोपी कळवा रेल्वे स्टेशन रोडवर संशयितरित्या फिरताना पोलिसांना दिसला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याने त्याचे नाव कलीम हारुण शेख (20 वर्ष रा. शांतीनगर झोपडपट्टी, कळवा) असे सांगितले. तसेच पोलिसांनी त्याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा शोध घेतला असता त्याच्या विरोधात अनेक जबरी चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी अटक आरोपीला सोनसाखळी चोरी प्रकरणी दिवा (मुंब्रा) पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. Thane Latest Crime News
पोलीस पथक
अशोक उत्तेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कळवा पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सागर सांगळे, पोलीस हवालदार शहाजी एडके, उमेश पाटील, श्रीमंत राठोड, गणेश बांडे, पोलीस शिपाई नामदेव कोळी, अमोल ढावरे यांनी कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. Thane Latest Crime News