Pune Crime News | लई भारी कामगिरी ! अट्टल चोरटा ‘जोजो’कडून २४ दुचाकी जप्त
- हडपसर तपास पथकाने १२ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला
पुणे, दि. ४ सप्टेंबर, मुबारक जिनेरी (महाराष्ट्र मिरर) Pune Crime News
पुणे शहरातील वाढत्या दुचाकी चोरीच्या घटना रोखण्यासाठी पुणे पोलिसांनी व्यापक मोहीम उघडली आहे. अशातच हडपसर पोलिसांनी लई भारी कामगिरी करत अट्टल चोरटा ‘जोजो’ कडून तब्बल २४ दुचाकी हस्तगत केल्या आहेत. मांजरी, मुंढवा, लोणीकाळभोर, लोणीकंद भागात ‘जोजो’ दुचाकी चोरीसाठी कुप्रसिद्ध झाला होता. हडपसर वपोनि संतोष पांढरे व तपास पथकाकडून सदर कामगिरी करण्यात आली आहे.
हडपसर तपासपथक अधिकारी अर्जुन कुदळे, सहा पोलीस निरीक्षक, महेश कवळे, पोलीस उप निरीक्षक, पोलीस अंमलदार दिपक कांबळे, चंद्रकांत रेजितवाड, अजित मदने, कुंडलीक केसकर असे पोलीस ठाणे हद्दीत वाहनचोरी प्रतिबंधक पेट्रोलींग करीत असताना, पोलीस अंमलदार दिपक कांबळे आणि चंद्रकांत रेजितवाड यांना गोपनिय मिळालेल्या बातमीवरून आरोपी नामे दिपक उर्फ जोजो बाबुराव सरवदे वय ३० रा. थोरात वस्ती, द्वारका मेडीकल समोर कोलवडी रोड मांजरी पुणे यास ताब्यात घेवून त्याचे कडे केले तपासात त्याने मांजरी, मुंढवा, लोणीकाळभोर, लोणीकंद, या भागातुन वेळोवेळी दुचाकी चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याचेवर यापुर्वी पुणे शहरात मोटार सायकल चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत.
आरोपीकडून आज रोजी पर्यंत एकुण २४ गुन्हे उघडकीस झाले असून किं.रू १२,५०,०००/- चा माल जप्त केला आहे. त्यामध्ये ०९ होंडा शाईन, ४ हिरोहोंडा पेंशन, ४ स्पलेंन्डर, २ हिरो होंडा डिलक्स, २ अॅक्टीव्हा, १ अॅव्हॅनजर, १ होंडा डिओ, १ होंडा ड्रिमयुगा, अशा २४ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. दुचाकी पुणे शहर, धाराशिव आणि लातुर या ठिकाणाहून हस्तगत करण्यात आल्या आहेत
Pune Police सदरची कामगिरी ही अमितेश कुमार, पोलीस आयुक्त पुणे शहर, रंजन कुमार शर्मा, पोलीस सह आयुक्त पुणे शहर, मनोज पाटील, अप्पर पोलीस आयुक्त , पूर्व प्रादेशिक विभाग, आर राजा, पोलीस उप आयुक्त परिमंडळ ५ यांचे मागदर्शनाखाली अश्विनी राख मॅडम, सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे, संतोष पांढरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर, निलेश जगदाळे, पोनि. (गुन्हे), यांचे सुचनांप्रमाणे तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे, पोलीस उप निरीक्षक महेश कवळे, तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे, पोलीस उप निरीक्षक महेश कवळे, पोलीस अंमलदार, दिपक कांबळे, चंद्रकांत रेजितवाड सुशील लोणकर, संदीप राठोड, जोतीबा पवार, समीर पांडुळे, सचिन जाधव, निलेश किरचे, प्रशांत दुधाळ, निखील पवार, भगवान हंबर्डे, अजित मदने, अतुल पंधरकर, अमित साखरे, अमोल दणके, कुंडलीक केसकर, तुकाराम झुंजार, अभिजीत राऊत, यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे.