Maharashtra Politics : कल्याणच्या शिंदेंच्या शिवसेनेला खिंडार, जिल्हाप्रमुखांचा शिंदे सेनेला जय महाराष्ट्र !
•शिवसेना शिंदे गटाचे कल्याण जिल्हाप्रमुख साईनाथ तरे आणि मनसेचे कल्याण विद्यार्थी सेनेचे सरचिटणीस गणेश नाईक यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बांधले शिवबंधन
मुंबई :- राज्यात विधानसभेच्या निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात असताना राज्यातील अनेक नेतेमंडळी सध्या पक्ष बांधणीकरिता प्रयत्नशील आहे. शिवसेना शिंदे गटाकडून जनसंवाद यात्रा काढण्यात आली आहे. तर अजित पवार यांच्या गटाकडून जनसन्मान यात्रा काढण्यात आली आहे. तसेच भाजपाकडूनही पक्ष बांधणीकरिता पदाधिकारी मेळावे घेण्यात येत आहे. तर शिवसेना ठाकरेकराकडूनही भगवा सप्ताह आणि पक्ष बांधणी चालू आहे. परंतु अशातच अनेक राजकीय नेते पक्षांतराच्या घटनाही वाढताना दिसत आहे. कल्याणमध्ये शिवसेना शिंदे गटाला खिंडार पडला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पूर्वीच ठाकरे गटाकडे मोठ्या प्रमाणे इन्कमिंग चालू झाली आहे.
शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख साईनाथ तरे यांनी शिंदे गटाला जय महाराष्ट्र करून शिवसेना ठाकरे गटाचे शिवबंधन बांधले आहे. साईनाथ तरे हे महानगरपालिकेचे नगरसेवक तसेच सभागृह नेता अशा विविध पदावर काम केले आहे. शिवसेना फुटी नंतर त्यांनी शिंदे गटाकडे जाण्याकडे पसंती दिली होती. परंतु पक्षांतर्गत वादा नंतर त्यांनी पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटामध्ये प्रवेश केला आहे. तसेच, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कल्याण विद्यार्थी सेनेचे सरचिटणीस गणेश नाईक यांनी हि शिवबंधन बांधत उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला आहे. कल्याण डोंबिवली हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. महानगरपालिका अस्तित्वात आल्यापासूनच येथे शिवसेनेचा भगवा फडकला आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाला या दोन नेत्यांच्या प्रवेशामुळे नक्कीच फायदा होण्याची चर्चा बोलली जात आहे.ह्यावेळी शिवसेना नेते विनायक राऊत, शिवसेना उपनेते विजय (बंड्या) साळवी तसेच इतर पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.