Kalyan Fake Police Scam : तोतया पोलिसांने लुटले 4.80 लाखांचे दागिने
Kalyan Latest Crime News : पोलिस असल्याची बतावणी करीत दुचाकीस्वार तीन भामट्याने 54 वर्षीय व्यक्तीचे सुमारे 4.80 लाख रुपयांचे दागिने लंपास केले. ही घटना मुंबई-नाशिक महामार्गावरील डोंगराळी येथे घडली. या प्रकरणी कोनगाव पोलिस ठाणेमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
कल्याण :- पोलिस Police officer असल्याची बतावणी करीत दुचाकीस्वार तीन भामट्याने 54 वर्षीय व्यक्तीचे सुमारे 4.80 लाख रुपयांचे दागिने लंपास केले. ही घटना मुंबई नाशिक महामार्गावरील डोंगराळी भागात घडली. या प्रकरणी कोनगाव पोलिस ठाणेमध्ये Kongaon Police Station गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. Kalyan Latest Crime News
काशिनाथ पांडुरंग पाटील (54 वर्ष, रा. घनसोली नवी मुंबई) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शनिवारी दुपारच्या सुमारास मुंबई-नाशिक वाहिनीवरून डोंगराळी येथून घराकडे जात असताना. मागून दुचाकीवर आलेल्या तीन भामट्याने पाटील यांना थांबवले. ‘मी पोलिस असून, पुढे वातावरण चांगले नाही. त्यामुळे अंगावरील दागिने पिशवीत काढून ठेवा,’ असे पाटील यांना त्याने सांगितले. पाटील यांनी गळ्यातील चैन आणि ब्रेसलेट काढून आरोपी बोलण्यात गुंतून हातचलाखीने काढून घेऊन त्यांची फसवणूक केली आहे. घडलेल्या घटनेबाबत पाटील यांनी कोनगाव पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी पाटील यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 204, 318 (4),3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असेल गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक धुमसे करत आहे. Kalyan Latest Crime News