मुंबई

Mumbai Crime News : ७७ वाहनांच्या मुळ मालकाचा शोधडायघर पोलिस ठाण्याची कामगिरी

पोलिस ठाण्याच्या आवारात ब-याच कालावधीपासून धुळखात पडलेल्या बेवारस मालमत्तेतील एकुण ७७ वाहनांच्या मुळ मालकाचा शोध शिळ – डायघर पोलिस ठाणे, ठाणे शहर आणि गंगामाता वाहन शोध संस्थेने लावला आहे. त्यापैकी ७७ दुचाकी, ६ चारचाकी आणि रिक्षा अशा एकूण ७७ वाहनांचा समावेश आहे. ही वाहने धुळखात पडल्यामुळे आरोग्याचा धोका निर्माण होतो. बेवारस वाहने ज्यांची आहेत त्यांनी योग्य कागदपञे दाखवून ती सात दिवसाच्या आत घेउन जावीत अन्यथा पोलिसांकडुन त्या वाहनाची कायदेशीर प्रक्रीया पूर्ण करण्यात येईल असे आवाहन शिळ – डायघर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक संदिपान शिंदे यांनी केले आहे.

विविध गुन्हयांमध्ये अशी वाहने पोलिस ठाण्यात जमा केली जातात. माञ न्यायालयीन प्रक्रीयेमुळे तसेच बेवारस वाहनाचे मालक मिळुन येत नसल्याने ही वाहने पोलिस ठाण्याच्या आवारात मालकाच्या प्रतिक्षेत पडून राहतात. या पार्श्वभूमिवर ठाणे शहर पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी बेवारस वाहनांच्या मालकाचा शोध घेउन ती वाहने ताब्यात देण्याचे आदेश प्रभारी अधिका-यांना दिले होते. त्यानुसार पोलिस सहआयुक्त चव्हाण, अप्पर पोलिस आयुक्त देशमुख, परिमंडळ १ पोलिस उपआयुक्त बुरसे, कळवा विभागाचे सहायक पोलिस आयुक्त कोळेकर, शिळ डायघर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक संदिपान शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार पोलिसांनी बेवारस वाहन मालकांचा शोध घेणे सुरु केले. त्यासाठी पोलिसांनी परंदवाडी, तळेगाव दाभाडे, ता. मावळ जि. पुणे येथील महाराष्ट्रात अग्रेसर असलेल्या गंगामाता वाहन शोध संस्थेची मदत घेतली. या संस्थेचे अध्यक्ष राम उदावंत यांनी शिळ – डायघर पोलिस ठाण्यात येउन बेवारस वाहनांची पाहणी केली. श्री. उदावंत व पोलिसांनी या वाहनांचे चेसीस नं. व इंजिन क्रमांकावरुन दोनच दिवसात ७७ वाहनांच्या मुळ मालकाचा शोध लावला. त्यासाठी गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक सुनिल वरुडे, भरत जाधव, विक्रांत कांबळे, राजेंद्र दणाणे, गणेश देशमुख यांच्यासह गंगामाता वाहन शोध संस्थेचे अध्यक्ष राम उदावंत, उपाध्यक्ष बाबासाहेब बागडे, भारत वाघ यांनी परिश्रम घेतले.

ज्यांची वाहने असतील त्यांनी पुरावा देउन ती घेउन जावीत अन्यथा त्यांचा लीलाव करुन आलेली रक्कम सरकारी तिजोरीत भरली जाईल असे आवाहन वरिष्ठ पोलिस निरिक्षम संदिपान शिंदे यांनी केले आहे. वाहनाचे चेसीस व इंजिन नंबर यांची यादी करुन बेवारस, अपघात व गुन्हयातील वाहने अशी वर्गवारी करुन मुळ मालकाचा पत्ता शोधला जातो. अनेकदा वाहनमालकाचा जुना पत्ता रजिस्टर नोंद असल्याने मालक त्या पत्यावर मिळुन येत नाही. त्यावेळी वाहनाची बारकाइने माहिती गोळा करुन मुळ मालकापर्यंत पोहाचण्याचा प्रयत्न केला जातो असे संस्थेचे अध्यक्ष राम उदावंत यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0