क्राईम न्यूजछत्रपती संभाजी नगर

Maharashtra Police Bribe News : पोलीस निरीक्षक आणि पोलीस अंमलदार एसीबीच्या जाळ्यात; तक्रारदाराला जागेवरील अतिक्रमण काढण्यासाठी एक लाखांची मागणी

ACB Arrested Police Officer For Taking Bribe : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग छत्रपती संभाजीनगर यांची ‌पुंडलिक नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आणि पोलीस अंमलदार यांच्यावर कारवाई, अतिक्रमण काढण्यासाठी पोलीस संरक्षण मागणाऱ्या तक्रारदाराकडे लाखोची लाच ; 50 हजार रुपये पहिला हप्ता (Chatrapati Sambhajinagar ACB Trap)

छत्रपती संभाजीनगर :- पुंडलिक नगर पोलीस ठाण्याचे Pundlik Nagar Police Station पोलीस निरीक्षक राजेश सुदाम यादव (45 वर्ष)  PI Rajesh Sudam आणि पोलीस अंमलदार सुरेश बाबू सिंग पवार हे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात ACB Bribe Trap अडकले आहे. तक्रारदाराच्या जागेवर झालेल्या अतिक्रमणाबाबत पोलीस संरक्षण मिळावे याकरिता पोलीस निरीक्षक आणि अंमलदार यांनी 1 लाखांची मागणी केली. त्यातील पहिला हप्ता म्हणून तक्रारदार यांनी पोलीस अंमलदार यांना पन्नास हजार रुपये दिले होते. ANTI-CORRUPTION BUREAU Latest News

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार यांच्या मालकीच्या ताब्यातील मौजे गारखेडा गट क्रमांक 50/2/4 मधील जमीन क्षेत्रफळ 24000 स्क्वेअर फुट रेणुका नगर ता .जि.छत्रपती संभाजीनगर (Chatrapati Sambhajinagar ACB Trap) मधील जागेवर झालेले अतिक्रमण काढण्यासाठी तक्रारदार यांनी पोलीस बंदोबस्त मिळवण्या करिता रीतसर अर्ज केला होता. अतिक्रमण काढण्यासाठी पोलीस अंमलदार पवार यांनी तक्रारदार यांच्याकडे एक लाख रुपये लाचेची मागणी करून. तडजोडीअंती 50 हजार रुपये ठरले व पोलीस बंदोबस्त देऊन अतिक्रमण काढल्यानंतर जागेचा ताबा मिळविल्या नंतर उर्वरित पैसे पोलीस निरीक्षक (साहेबांना) देण्याचे ठरले, दिनांक 3 एप्रिल 2024 रोजी पोलीस अंमलदार सुरेश बाबूसिंग पवार (पुंडलिक नगर पोलीस ठाणे )यांनी 50 हजार रू स्विकारले परंतु जागेवरील अतिक्रमण न काढल्यामुळे, तक्रारदार यांनी पोलीस अंमलदार पवार यांची भेट घेऊन त्यांना दिलेल्या पैशाची विचारणा केली असता त्यांनी मला पोलीस निरीक्षक यांच्या कॅबिनमध्ये घेऊन गेले व त्या ठिकाणी पोलीस निरीक्षक, राजेश यादव यांच्या समोर उभे केले. मी त्यांना दिलेल्या 50 हजार रुपये विषयी विचारणा केली असता त्यांनी सांगितले की तुमचे काम न झाल्यामुळे आम्ही तुमचे पैसे दोन टप्प्यात परत देतो असे पोलीस निरीक्षक राजेश यादव म्हणाले हे सर्व तक्रारदार यांनी त्यांचे मोबाईल मध्ये रेकॉर्ड केले Mobile Call Recording असून सदर घटनेवरून एसीबीने कारवाई करत पुंडलिक नगर Pundlik Nagar Police Station येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे. ANTI-CORRUPTION BUREAU Latest News

एसीबी पथक

संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.छत्रपती संभाजीनगर. मुकुंद अघाव , अपर पोलिस अधीक्षक ला.प्र.वि. छत्रपती संभाजीनगर,सुरेश नाईकनवरे पोलीस उपाधीक्षक छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी राजीव तळेकर पोलीस उपाधीक्षक ला.प्र.वि. छत्रपती संभाजीनगर सापळा पथक – पोलीस हवालदार प्रकाश घुगरे, अशोक नागरगोजे पोलीस अंमलदार सी. एन. बागुल ला. प्र. वि. छत्रपती संभाजीनगर यांनी कारवाई केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0