[ सोबत बारा कार्यकर्ते अन् निघाले आमदार व्हायला ! ]
दौंड, ता. ३० राजकारण हे करिअरशी जोडले गेले असल्याने आणि इतर निवडणुका बेभरवशाच्या झाल्याने राजकारणात सक्रिय असलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याला उठसूठ मुंबई दिसते आहे. प्रत्येकाला आमदार व्हावे असे वाटतं असून भावी आमदारांचा दौंड Daund MLA तालुक्यात अक्षरशः खच पडला आहे. यावरून राजकारणाची परिभाषा बदलत चालली असल्याचेच दिसून येते.
विधानसभा निवडणूक जशी जवळ येऊ लागली आहे, तसे अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. दौंड विधानसभेवर अनेकांकडून दावा केला जात असून एका गोऱ्या गोमट्या स्वयंघोषित कार्यकर्त्याला आमदारकीचे स्वप्न पडू लागले आहेत. सोबत बोटावर मोजण्या एवढेच दहा बारा कार्यकर्ते अन् आव माञ आमदारकीचा आणला जातोय. समाजाला कवडीची किंमत नसताना समाज आपल्या मागे असल्याचा ऊर या कथित कार्यकर्त्यांकडून सध्या बडविला जात आहे. राजकारण हा मुख्य व्यवसाय झाला आहे. कोणीही उठतो आणि उठसूठ राजकारणात जातो. चार दोन कार्यक्रमात सहभागी घेतला, पंधरा वीस कार्यकर्ते जमविले की त्याला निवडणुकीचे वेध लागतात आणि लगेचच आमदारकीचे स्वप्न पडतात. दौंड विधानसभा मतदारसंघात राजकारणामुळे अत्यंत नाजूक अशी सामाजिक परिस्थिती निर्माण झाली आहे. याचा फायदा घेण्यासाठी अनेकजण पुढे सरसावत आहेत. Daund Latest News
आता तर आमदार होण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. प्रत्येक विधानसभेचा आढावा घेतला तर एका विधानसभेत १० बारा कार्यकर्ते इच्छुक असल्याचे दिसते. सध्याच्या जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर दौंड विधानसभा सर्वाधिक चर्चेत येऊ लागली आहे. Daund Latest News
जिल्ह्यामध्ये मराठा आणि ओबीसी अशी विभागणी झाल्याने याचा परिणाम दौंड विधानसभा Daund Vidhan Sabha News मतदारसंघात चांगलाच जाणवणार आहे. ही परिस्थिती पाहून अनेकांना दौंड विधानसभेचे स्वप्न पडू लागले आहे. Daund Latest News
अशाच एका गोऱ्या गोमट्य आणि आपल्या दहा बारा कार्यकर्त्यांना सोबत घेऊन फिरणाऱ्या स्वयंघोषित कार्यकर्त्याला दौंडच्या आमदारकीचे स्वप्न दिवसाढवळ्या पडू लागले आहे. हा कथित कार्यकर्ता आपल्या मोजक्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन अधून मधून आंदोलनाच्या उचापात्या करीत असतो. समाजासाठी नाही माञ आपल्या नेत्यासाठी सतत झटत असतो. नेता जे सांगेल तेवढेच करण्याचे याचे काम असते. Daund Latest News