क्राईम न्यूजमुंबई
Trending

Navi Mumbai Murder News : नवी मुंबईतील दुहेरी हत्याकांडाची अखेर उकल ; वपोनि ब्रम्हानंद नाईकवाडी यांचा कौशल्यपूर्ण तपास

Navi Mumbai Latest Murder News : पोलिसांना गुंगारा देण्यासाठी हत्येत सहभागी दिसू नये तसेच दिशाभूल करण्याकरिता स्वत:च्या पायावर गोळी मारून घेतली

नवी मुंबई :- नवी मुंबईतील दोघा रिअल इस्टेट एजंटच्या हत्येचे Real Estate Agent Murder गूढ उकलण्यास अखेर नवी मुंबई पोलिसांना Navi Mumbai Police यश आले आहे. नेरुळचे वपोनि ब्रम्हानंद नाईकवाडी यांची कौशल्यपूर्ण तपास करत आरोपींचा छडा लावला आहे.

. याप्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे. Navi Mumbai Police Arrested Criminal या दुहेरी हत्याकांडातील फरार असलेल्या एका आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती नेरुळ पोलिसांनी दिली आहे. पोलीसांनी कारमधील संशयीत वस्तु व कार जप्त करुन प्रकरणात घातपाताचा प्रकार दिसुन आल्याने नेरुळ पो. ठाणे बी एन एस कायदा कलम 140 (1), 109(1) आर्म ॲक्ट 3,25 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आले होते. Navi Mumbai Latest Murder News

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी विठ्ठल नाखाडे याने मृत इस्टेट एजंट सुमित जैन (39 वर्ष) याच्याशी संगनमत करून आपला दुसरा सहकारी इस्टेट एजंट अमिर खानजादा (42 वर्ष) याची बुधवारी (28 ऑगस्ट ) नेरूळ येथे आपल्या गाडीतच गोळ्या घालून हत्या केली व त्याचा मृतदेह कर्नाळा येथील जंगलात फेकून दिला. अमिरच्या हत्येत आपला सहभाग आढळून येऊ नये; तसेच पोलिसांना गुंगारा देण्यासाठी हत्येत सहभागी झालेला दुसरा इस्टेट एजंट सुमित जैन याने स्वत:च्या पायावर खोपोली येथे गोळी मारून घेतली. मात्र स्वत:ला जखमी करण्याच्या नादात सुमित जैन याच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला होता. Navi Mumbai Latest Murder News

पोलीस निरीक्षक, ब्रम्हानंद नाईकवाडी यांनी तपास करत संपूर्ण घटनेचा उलगडा केला आहे. यादरम्यान हत्येच्या सुपारीचे कबूल केलेले 50 लाख देण्याच्या वादातून आरोपींनी सुमितच्या पायावर आणि शरीरावर चाकूने वार केले. यामध्ये सुमितचाही मृत्यू झाला. दरम्यान, या दोन्ही रिअल इस्टेट एजंटच्या मिसिंगची तक्रार गुरुवारी (22 ऑगस्ट) नेरूळ पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. यादरम्यान पोलिसांना आरोपींची कार खोपोली येथे बेवारस स्थितीत आढळून आली. या कारमध्ये बंदुकीच्या पुंगळ्या आणि रक्ताचे डाग आढळून आले. त्यानंतर सुमित जैन या इस्टेट एजंटचा मृतदेह खोपोली-पेण मार्गावरील गागोदे गावाजवळ सापडला.

परंतु, अमिर खानजादा याचा थांगपत्ता लागत नसल्यामुळे पोलिसांनी आपली शोधमोहीम अधिक तीव्र करून या हत्येचा मास्टरमाईंड असलेला आरोपी विठ्ठल नाकाडे (43 वर्ष) याला ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी या दुहेरी हत्याकांडात सहभागी असलेले आरोपी जयसिंग मुदलीयार (38 वर्ष), आनंद क्रूझ (39 वर्ष), वीरेंद्र कदम (24 वर्ष), अंकुश सिताफे (35 वर्ष) यांना ताब्यात घेतले आहे.गुन्हयाचा तपास नेरुळ पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, ब्रम्हानंद नाईकवाडी हे करीत आहेत.

पाचही आरोपींच्या विरोधात नवी मुंबई सह राज्यातील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहे.विठठ्‌ल बबन नाकाडे, याच्या विरोधात तीन गुन्हे दाखल आहे.जयसिंग मुदलीयार त्याच्याविरोधात मुंबई ठाणे उल्हासनगर तीन गुन्हे दाखल आहे.आनंद क्रूझ याच्या विरोधात बेकायदेशीर येथे हत्यार वापरल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहे.वीरेंद्र कदम यांच्या विरोधात एक गुन्हा दाखल आहे.अंकुश सिताफे आरोपीच्या विरोधात तीन गुन्हे दाखल आहे. Navi Mumbai Latest Murder News

पोलीस पथक
सहा पोलीस आयुक्त अजयकुमार लांडगे गुन्हे शाखा व सहाय्यक पोलीस आयुक्त मुयर भुजवळ, तुर्भे विभाग यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी पोलीस निरीक्षक सुनिल शिंदे, पोलीस निरीक्षक हनिफ मुलाणी, पोलीस निरीक्षक उमेश गवळी, पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश जाधव, सतीश भोसले, श्रीनिवास तुंगनवार, प्रविण फडतरे, निलेश पाटील, मंगेश देसाई, पोलीस उपनिरीक्षक संजय रेड्डी, राहुल बदाने, देवकाते, अभय शिंदे, व त्यांची पथके नेरुळ पोलीस ठाणे ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवाडी, पोलीस निरीक्षक महेश पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेलार, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश शेवाळे व पथक, पोलीस उप निरीक्षक निवृत्ती शिंदे तुर्भे पो. ठाणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन ढगे एन आर आय पो. ठाणे पोलीस उपनिरीक्षक वाघ सिबीडी पो. ठाणे यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0