Share Market Fraud : शेअर मार्केटमध्ये जास्त परतावा मिळवून देतो असे सांगून लाखोंची फसवणूक, instagram च्या जाहिरातीवरून तब्बल तीस लाखांची फसवणूक
Share Market Fraud In Dombivali: शेअर बाजारात गुंतवणूक करुन भरघोस परतावा मिळवून देण्याचं आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे
डोंबिवली :- शेअर बाजारात गुंतवणूक Share Market Investment करुन अधिक परतावा मिळवून देतो अशी बतावणी करून तब्बल तीस लाख वीस हजार रुपयाची आर्थिक फसवणूक झाल्याची घटना डोंबिवली मानपाडा पोलीस ठाण्यात Dombivli Manpada Police Station दाखल झाली आहे. इंस्टाग्राम वर जाहिराती पाहून पैसे गुंतवणूक केल्याचे पोलीस तक्रारीत सांगितले आहे. जुलै ते ऑगस्ट महिन्याच्या कालावधीत ही फसवणूक झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पलावा डोंबिवली पूर्व येथे राहणाऱ्या अतुलकुमार मार्कंडराव अंदेवार (51 वर्ष) यांना एका महिलेने इंस्टाग्राम वर धनवर्षा 1200 प्रॉफिट प्लाॅन नावाची जाहिरात पाठविले होते. अतुलकुमार यांनी त्या जाहिरातीच्या लिंकवर क्लिक केल्यानंतर व्हाट्सअप ग्रुपला ऍड करून घेतले. त्यानंतर शेअर ट्रेडिंग केल्यास अधिक नफा मिळण्याचे अमिष दाखविले. अतुलकुमार यांच्या आयसीआयसीआय बँक खात्यातून एकूण 30 लाख 29 हजार रुपये परस्पर ऑनलाईन काढून घेतले. तसेच त्यांनी गुंतवलेले पैसे कोणताही नफा न मिळाल्याने आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मानपाडा पोलिसांनी महिलेच्या विरोधात भारतीय तंत्रज्ञान अधिनियम सन 2000 चे कलम 66 (ड) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गोरे हे करत आहे.