मुंबई

Sanjay Raut : खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासह गृहखात्यांवर उपस्थित केले प्रश्न

Sanjay Raut On Devendra Fadnavis  : कालच्या प्रकरणात गृह मंत्रालयाने काय कारवाई केली? तुमच्याच पोलिसांना तुमच्याच पक्षाचे कार्यकर्ते शिव्या देत आहेत. संजय राऊत यांचे देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न

मुंबई :– आदित्य ठाकरे Aaditya Thackeray आणि नारायण राणे Naryan Rane आणि नितेश राणे Nitesh Rane यांच्यात झालेल्या शाब्दिक चकमकीनंतर मालवण च्या राजकोट गडावर मोठ्या प्रमाणावर गोंधळाचे वातावरण झाले नारायण राणे यांनी खुल्या पोलिसांसमोर धमकी दिली. तर निलेश राणे यांनी पोलिसांवर अरेरावी करत त्यांना मोठ्या प्रमाणात सुनावले होते या सगळ्या घडामोडींवर खासदार संजय राऊत यांच्याकडून प्रतिक्रिया येत टीका केली आहे.मालवणमध्ये काल जो प्रकार घडला, त्यावरुन गृहमंत्रालयाला लाज वाटायला हवी, अशा शब्दात उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत Sanjay Raut यांनी सुनावले आहे. पोलिस प्रशासनावर त्यांच्याच पक्षाचे गुंड तोंडावर थुंकत होते, त्यांना शिव्या देत होते, असा आरोप संजय राऊत Sanjay Raut यांनी केला आहे. ज्या प्रकारे पोलिस अधिकाऱ्यांना शिव्या देण्यात आल्या ते गृहमंत्रालयाच्या तोंडावर थुंकण्यासारखे असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे. मालवण घटनेवरुन त्यांनी भाजपसह सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली.

खासदार संजय राऊत म्हणाले की, कालच्या प्रकरणात गृह मंत्रालयाने काय कारवाई केली? तुमच्याच पोलिसांना तुमच्याच पक्षाचे कार्यकर्ते शिव्या देत आहेत. तुम्ही काय करत आहात? असा प्रश्न त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना विचारला. महाराष्ट्रामध्ये तुम्ही जर वर्दीचा सन्मान करू शकत नसताल तर तुम्ही राजीनामा द्या, असे आवाहन देखील संजय राऊत यांनी केले आहे. पश्चिम बंगालमध्ये काय चालू आहे, याची काळजी करण्यापेक्षा महाराष्ट्रात काय चालू आहे? याची चिंता करा, असे आवाहन देखील संजय राऊत यांनी केले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या कामात देखील किती मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे, हे समोर आले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य कसे चालवायचे याची शिकवण दिली. त्याच महाराजांच्या कामात सत्ताधाऱ्यांनी भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप देखील संजय राऊत यांनी केला आहे. या कामांमध्ये शेकडो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांनी केला आहे. अजित पवार यांनी या विरोधात आंदोलन करणार असल्याचे म्हटले आहे. मात्र, आंदोलन करून काही होणार नाही तर राजीनामा द्या अशी मागणी देखील संजय राऊत यांनी केली आहे.

भ्रष्टाचार झाला आहे असे अजित पवार यांनी समोर येऊन स्पष्टपणे बोलावे, असे आवाहन देखील संजय राऊत यांनी केले आहे. आयएनएस विक्रांत प्रकरणात देखील भारतीय जनता पक्षाच्या मुलुंडमधील नेत्यांनी 50 कोटी रुपये खाल्ले असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. मात्र हे सर्व प्रकरण दाबण्याचे काम देवेंद्र फडणवीस करतात. त्यामुळेच त्यांच्यावर महाराष्ट्राचा राग असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. राष्ट्रपतींना पश्चिम बंगालमधील घटनेची काळजी आहे त्यांनी महाराष्ट्राकडे देखील थोडे लक्ष द्यावे, असे आवाहन देखील संजय राऊत यांनी केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0