Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकरणी हा पुतळा तयार करणाऱ्या शिल्पकार जयदीप आपटे यांच्यावर टीका
पुतळ्याच्या डोक्यावर आठवणीची खूणही ठेवली….. Jitendra Awhad यांचे ट्विट
मुंबई :- राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्यामुळे अवघ्या महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली आहे. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार नेते जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकरणी हा पुतळा तयार करणाऱ्या शिल्पकार जयदीप आपटे यांच्यावर टीका केली आहे. या आपटेला आपटावेच वाटते, अशा तीव्र शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 4 डिसेंबर 2023 रोजी एका दिमाखदार कार्यक्रमात या पुतळ्याचे अनावरण केले होते. हा पुतळा 26 ऑगस्ट रोजी दुपारी अचानक कोसळला. हा पुतळा नेमका कशामुळे कोसळला? हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पण यामुळे जनतेमध्ये संतापाची लाट उसळली आहे. विरोधकांनी या प्रकरणी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.
आमदार जितेंद्र आव्हाड यांचे ट्विट?
मालवणच्या राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारणारा जयदीप आपटे हा फेसबुकवर आपल्या एका मित्राशी माजल्यासारखा बोलतो. त्याचा मित्रही याच्यासारखाच; पुतळ्याच्या डोक्यावर आठवणीची खूणही ठेवली आहेस, असे तो म्हणतो. त्यावर आपटे, ” पुतळा बनवताना पूर्ण अभ्यास करावा लागतो.” असे सांगतो. जर आपटेने पुतळा साकारताना हाच अभ्यास केला असता तर महाराष्ट्राला अपमानित व्हावे लागले नसते. या निमित्ताने पुन्हा एकदा सिद्ध झाले की आपल्या महाराजांवर वार करणाऱ्या अफजलखानाचा वकील कृष्णा कुलकर्णीच्या औलादी आजही जीवंत आहेत.
कुलकर्ण्याने केलेला तो वार फक्त महाराजांवर नव्हता, तर तो वार स्वराज्यावर होता मराठी मनावरची न मिटणारी जखम म्हणूनच महाराजांनी आपल्या तलवारीने कुलकर्ण्याचे मुंडके छाटले, हा इतिहास आहे. परंतु,दोन मित्रांमधील फेसबुकवरील चर्चा आणि त्यामध्ये महाराजांच्या डोक्यावरील खुणेचा उल्लेख करून ती दाखवणे… किळस येते ! या आपटेला आपटावासा वाटतोय!!