Bhiwandi Police Arrested Drug Peddler : भोईवाडा पोलिसांची कारवाई, 16 लाखाहून अधिक किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी केला जप्त
भिवंडी :- गांजा अमली पदार्थाचे तस्करी करणाऱ्या दोन आरोपींना भिवंडी पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींकडून 16 लाख 68 हजार 504 किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. Bhiwandi Crime News
1 मार्च रोजी सायंकाळी 06 वाजून 10 मिनिटांच्या सुमारास गुन्हे शाखा घटक-2 भिवंडी पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार साहजिक पोलीस निरीक्षक माळी पोलीस शिपाई यांनी इंगळे या पथकाने गुंजर धाब्यासमोर अंजुर फाट्यावरून वसई कडे जाणाऱ्या रोडवर सापळा रचून दोन आरोपींना अटक केले आहे. आरोपी राजकिशोर ध्रुतकृष्ण बेहेरा (31 वर्ष), सागर सुरेंद्र नायक (29 वर्ष) या दोन संशयित आरोपींची पोलिसांनी अंग जडते घेतले असता त्यांच्याकडील सॅक बॅग मध्ये गांजा अंमली पदार्थ आढळून आला आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून आरोपींकडून गांजा, रेडमी कंपनीचा मोबाईल फोन, आणि रोख रक्कम असा एकुण 16 लाख 68 हजार 504 रुपायाचा मुद्देमाल बाळाकडे अटक केली आहे.प्रकाराबाबत सरकार तर्फे दिलेल्या फिर्यादी वरुन आरोपींविरूध्द गुन्हा एन.डी.पी.एस. कायदा 1985 चे कलम 8 (क), 20 (ब) II (क), 29 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन, दोनही आरोपीस अटक करण्यात आली आहे. गुन्हयाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक माळी हे करीत आहेत. Bhiwandi Crime News