FIR On Bhagyashree Navtake : आयपीएस अधिकारी भाग्यश्री नवटक्के यांच्यावर गुन्हा दाखल, फसवणुकीचा आरोप
•Police Officer Bhagyashree Navtake Is In Jail पुणे पोलीस दलात खळबळ जनकघटना, आयपीएस अधिकाऱ्यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल
पुणे :- पुणे पोलीस दलातून खळबळजनक बातमी समोर आली आहे. आयपीएस अधिकारी भाग्यश्री नवटक्के यांच्यावर फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील बंडगार्डन पोलिस ठाण्यात गृहविभागाच्या आदेशाने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं काय प्रकार आहे?
भाईचंद हिराचंद रायसोनी(BHR) जळगाव या पतसंस्थेने ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांनी 2021 साली तीन गुन्हे नोंदवले. त्यावेळी पोलीस उप-आयुक्त भाग्यश्री नवटके कार्यरत होत्या. BHR पतसंस्थेतील गैरव्यवहार प्रकरणाच्या मुख्य संशयिताने शासनाकडे केलेल्या तक्रारीमध्ये 2 DCP, 1 ACP, 6 Sr PI, 2 API, 1 PSI सह इतर चौघांचा समावेश आहे.गृहविभागाच्या आदेशाने हा गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. बंडगार्डन पोलिस ठाण्यात रात्री अंत्यत गुप्तता पाळत हा गुन्हा नोंदवला गेला. यावरून मात्र पुणे पोलिसांसह राज्य पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
आयपीएस अधिकारी भाग्यश्री नवटक्के या पुण्यात आर्थिक व सायबर गुन्हे शाखेच्या उपायुक्त होत्या.त्यावेळी बीएचआर पतसंस्थेवर कारवाई करण्यात आलेली होती.त्यांच्या नेतृत्वाखाली जळगावात एकाच वेळी 10 पेक्षा अधिक ठिकाणी छापे घालण्यात आले होते. या छाप्याच्या वेळी अनेक गैरबाबी करण्यात आल्याचे सुनिल झंवर व इतरांनी समोर आणले होते. त्यात छाप्यासाठी गेलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचार्यांच्या जेवणाचे बील दुसर्याच व्यक्तीने दिले. छाप्यासाठी जाताना वापरलेल्या खासगी गाड्याही दुसर्यांच्या असल्याचे सांगण्यात आले. आपल्याला यात राजकीय कारणावरुन अडकविण्यात आल्याचा आरोप सुनिल झंवर यांनी केला होता.याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांच्या प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.