Jai Jawan Govinda Pathak : मुंबईसह, ठाणे, मुंबई उपनगर हजारो दहीहंडी उत्सवात गोविंदा पथक सहभागी
मुंबई :- मुंबईत दहीहंडी उत्सावाला उत्साहात सुरुवात झाली आहे. मुंबईत पहिल्याच प्रयत्नात विक्रोळी येथे 9 थरांची सलामी देण्यात आली आहे. Jai Jawan Govinda Pathak मुंबई, ठाण्यात आज सर्वत्र ढाकुमाकुम, ढाकुमाकुम, ‘बोल बजरंग बली की जय’ हे स्वर कानावर ऐकायला मिळतायत.मुंबईत विक्रोळी टागोरनगर येथे 9 थर रचून सलामी देण्यात आली आहे. मुंबई उपनगरचा राजा अशी ओळख असलेल्या जोगेश्वरीच्या जय जवान गोविंदा पथकाने पहिल्याच प्रयत्नात 9 थरांची सलामी दिली. जोगेश्वरीच हे पथक मुंबईतील मानाच्या दहीहंड्या फोडून दुपारपर्यंत ठाण्यात दाखल होईल. ठाण्यात दरवर्षी मोठ्या पारितोषिकांच्या दहीहंड्या बांधल्या जातात. जितेंद्र आव्हाड यांच्या संघर्षच्या दहीहंडीमुळे ठाण्यात दहीहंडी उत्सवाला ग्लॅमर मिळालं. पण मागच्या काही वर्षांपासून जितेंद्र आव्हान दहीहंडी उत्सव साजरा करत नाहीत. ठाण्याचे आमदार प्रताप सरनाईक, रविंद्र फाटक यांच्याकडून दरवर्षीप्रमाणे दहीहंडी उत्सवाच आयोजन केलं जातं.
मुंबईत दोन मोठी गोविंदा पथक आहेत. माझगाव ताडवाडी आणि जय जवान. या दोन्ही गोविंदा पथकांच सर्वाधिक उंचीचे थर रचून मोठ्या पारितोषिकांच्या दहीहंड्या फोडण्याचा रेकॉर्ड आहे. जय जवान गोविंदा पथकाची उपनगरचा राजा अशी ओळख आहे. जय जवान गोविंदा पथक दरवर्षी 9 थर रचून हंड्या फोडते. माझगाव ताडवाडी गोविंदा पथक 8 थर लीलयाच रचते. माजी आमदार आणि मनसे नेते बाळा नांदगावकर या माझगाव ताडवाडी गोविंदा पथकाशी संबंधित आहेत.