राज्यातील 17 बड्या अधिकाऱ्यांची बदली
•गडचिरोली, चंद्रपूर,रायगड,नंदुरबार या जिल्ह्यांना सहाय्यक जिल्हाधिकारी मिळाले
मुंबई :- ऑक्टोंबर किंवा नोव्हेंबर महिन्यात राज्यात विधानसभेच्या निवडणुकीचे बिगुल वाजू शकतात. त्यामुळे प्रशासनाने ही निवडणूक हातात घेतल्याचे दिसून येत आहे. राज्यातील 17 बड्या अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे.तर मंत्रालयातील 14 अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. तसेच गडचिरोली, चंद्रपूर,रायगड आणि नंदुरबार या जिल्ह्यांना सहाय्यक जिल्हाधिकारी मिळाले आहेत. यापूर्वीच राज्यातील पोलीस प्रशासनातील महत्त्वाच्या अधिकाऱ्यांची बदली झाल्याचे पाहायला मिळाले होते. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वीच राज्यात प्रशासकीय आदलाबदली चालण्याचे दिसत आहे.
कोणत्या अधिकाऱ्यांच्या कुठून- कुठे बदली झाली आहे
अधिकारी-सध्या-बदली
1.पी. प्रदीप-मंत्रालयात नियुक्तीच्या प्रतीक्षेत-सीईओ खादी मंडळ.
2.वासुमना पंत-सेरीकल्चर, संचालक नागपूर-महासंचालक वनामती.
3.मिताली सेठी-महासंचालक वनामती-जिल्हाधिकारी नंदुरबार
4.पुलकित सिंग-प्रकल्प अधिकारी आयटीडीपी-सहा. जिल्हाधिकारी, कंधार
5.प्रियंवदा म्हाडाळकर-मंत्रालयात नियुक्तीच्या प्रतीक्षेत-प्रकल्प अधिकारी आयटीडीपी, धारणी
6.अर्पित चव्हाण-मंत्रालयात नियुक्तीच्या प्रतीक्षेत-प्रकल्प अधिकारी, आयटीडीपी, नाशिक
7.नमन गोयाल-मंत्रालयात नियुक्तीच्या प्रतीक्षेत-सहा. जिल्हाधिकारी गडचिरोली
8.अनय नावंदर-मंत्रालयात नियुक्तीच्या प्रतीक्षेत-प्रकल्प अधिकारी आयटीडीपी, तळोदा
9.जस्मिन-मंत्रालयात नियुक्तीच्या प्रतीक्षेत-सहा. जिल्हाधिकारी, राजापूर
10.अकुनुरी नरेश-मंत्रालयात नियुक्तीच्या प्रतीक्षेत-प्रकल्प अधिकारी, काळवण
11.अमित रंजन-मंत्रालयात नियुक्तीच्या प्रतीक्षेत-सहा. जिल्हाधिकारी गडचिरोली
12.अंजली शर्मा-मंत्रालयात नियुक्तीच्या प्रतीक्षेत-सहा. जिल्हाधिकारी नंदुरबार
13.डॉ. अपूर्वा बासूर-मंत्रालयात नियुक्तीच्या प्रतीक्षेत-सहा. जिल्हाधिकारी चंद्रपूर
14.ओंकार पवार-मंत्रालयात नियुक्तीच्या प्रतीक्षेत-सहा. जिल्हाधिकारी, इगतपुरी
15.झेनिथ डोंठुला-मंत्रालयात नियुक्तीच्या प्रतीक्षेत-सहा. जिल्हाधिकारी वरोरा
16.रंजित मोहन यादव-मंत्रालयात नियुक्तीच्या प्रतीक्षेत-सहा. जिल्हाधिकारी गडचिरोली
17.कुशल जैन-मंत्रालयात नियुक्तीच्या प्रतीक्षेत-सहा. जिल्हाधिकारी रायगड