सिंधुदुर्गमहाराष्ट्र

Sindhudurga Shivaji Maharaj Statue : सिंधुदुर्गातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला

Chhatrapati Shivaji Maharaj Statue collapsed: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डिसेंबर 2023 मध्ये उद्धाटन, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा कोसळल्यानंतर शिवप्रेमींची संतापाचे लाट

सिंधुदुर्ग :- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी PM Modi मुख्यमंत्री एकनाथ शिंदे CM Eknath Shinde आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील समुद्र किनाऱ्यावर छत्रपती शिवाजी महाराज Chhatrapati Shivaji Maharaj Statue collapsed यांचा उभारण्यात आलेला भव्य पुतळा सोमवारी दुपारी कोसळला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिसेंबर महिन्यात या पुतळ्याचे लोकार्पण केले होते. त्यानंतर अवघ्या 8 महिन्यांतच हा पुतळा पडल्यामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 4 डिसेंबर 2023 रोजी एका दिमाखदार कार्यक्रमात या पुतळ्याचे अनावरण केले होते. हा पुतळा एकूण 43 फूट उंच होता. त्यात जमिनीपासून बांधकाम 15 फूट चबुतरा, तर त्यावर 28 फूट उंचीचा पुतळा उभा होता. हा भव्य पुतळा सोमवारी दुपारी अचानक कोसळला. हा पुतळा नेमका कशामुळे कोसळला? हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पण यामुळे जनतेमध्ये संतापाची लाट उसळली आहे. विरोधकांनी या प्रकरणी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.

खासदार सुप्रिया सुळे यांनी निष्कृष्ट दर्जाचे काम करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करून चौकशी करावी अशी केली मागणी

देशाचे पंतप्रधान जेंव्हा एखाद्या स्मारकाचे तथा वास्तूचे उद्घाटन करतात तेंव्हा त्याचे काम दर्जेदारच असेल जनतेला खात्री असते. परंतु सिंधुदुर्गातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा वर्षभरातच कोसळला. हा छत्रपती शिवरायांचा अवमान आहे. विशेष म्हणजे या स्मारकाचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 4 डिसेंबर 2023 रोजी करण्यात आले होते. ज्याअर्थी एक वर्षही पुर्ण न होता हा पुतळा कोसळला त्याअर्थी त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले होते हे उघड आहे. या अर्थाने हि प्रधानमंत्री महोदयांची आणि जनतेची देखील उघड फसवणूक आहे. या पुतळ्याचे काम निकृष्ट दर्जाचे का झाले यासह इतर अनेक गोष्टींची कसून चौकशी होणे गरजेचे आहे.

कुडाळचे ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी या घटनेची पुष्टी करत सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. ते म्हणाले, शिवाजी महाराज यांचा पुतळा निकृष्ट बांधकामामुळे कोसळला आहे. ही दुःखद घटना असून, एक शिवप्रेमी म्हणून आम्ही याचा निषेध करतो. काही महिन्यांपूर्वीच कोट्यवधी रुपये खर्च करून हा पुतळा उभारण्यात आला होता. त्यावेळी स्थानिकांनी बांधकामावर काही हरकती घेतल्या होत्या. पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. 400 वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या किल्ल्याचा आजपर्यंत एक दगडही हलला नाही. पण 6 महिन्यांपूर्वीचा पुतळा कोसळला. या प्रकरणी दोषींवर गुन्हे दाखल झाले पाहिजे. अन्यथा या प्रकरणी जिल्हाभर नव्हे राज्यभर आंदोलन केले जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0