Thane Crime News : सोनसाखळी चोरी करणाऱ्या सराईत आरोपीला अटक, 10 गुन्हयांची उकल
Thane Crime Branch Arrested Chain Snatcher : ठाणे गुन्हे घटक-5 शाखेची कारवाई ; आरोपीच्या विरोधात राज्यभरात तब्बल 45 गुन्हे दाखल आहे
ठाणे :- सोनसाखळी चोरी Chain Snatcher करणाऱ्या सराईत आरोपीला अटक करण्यात गुन्हे घटक-5 शाखेच्या पोलिसांना Thane Crime Branch यश मिळाले आहे. आरोपीकडून ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून 10 गुन्ह्यांची उकल करून 3 लाख 13 हजार 325 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना Thane Police Station यश आले आहे. आरोपीच्या विरोधात संपूर्ण राज्यभर 45 गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. Thane Latest Crime News
कापूरबावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत भादवि कलम 392,34 प्रमाणे दाखल गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा घटक-5 कडून सुरू असताना गुन्हे शाखा, वागळे युनिट -5 ठाणे चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांना मिळालेल्या बातमीच्या आधारे पोलिसांनी सराईत आरोपी गुलामअली उर्फ नादर सरताज जाफरी, (रा. अंबिवली, कल्याण) याने केला असल्याची माहिती प्राप्त झाल्याने मिळालेल्या बातमीच्या आधारे गुलामअली उर्फ नादर सरताज जाफरी, (40 वर्ष रा. माणीगाव, आंबीवली) कल्याण येथून ताब्यात घेवुन त्याचेकडे सखोल चौकशी व कौशल्यपुर्ण तपास केल्यानंतर गुन्हयाची कबुली दिली आहे.त्यांचेकडुन ठाणे पोलीस आयुक्तालयातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात सोनसाखळी चोरीचे दाखल असलेले 10 गुन्हे उघकीस आणुन, 83 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा एकुण 3 लाख 13 हजार 325 रू किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.पुढील तपास गुन्हे शाखा घटक 5 वागळे इस्टेट कडुन करण्यात येत आहे. Thane Latest Crime News
पोलीस पथक
अपर पोलीस आयुक्त गुन्हे पंजाबराव उगले, पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री शिवराज पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त शोध 1 गुन्हे शेखर बागडे, यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा घटक 5 वागळे ठाणे चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके, पोलीस निरीक्षक नितीन पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पल्लवी इगेपाटील, पोलीस उपनिरीक्षक तुषार माने, पोलीस उपनिरीक्षक सुनिल अहिरे, पोलीस हवालदार सुनिल निकम,विजय काटकर,रोहीदास रावते,जगदीश न्हावळदे,सुशांत पालांडे, अजय साबळे, माधव वाघचौरे, विजय पाटील, महिला पोलीस हवालदार मिनाक्षी मोहीते,सुनिता गिते, पोलीस नाईक तेजस ठाणेकर,रघुनाथ गार्डे,उत्तम शेळके, पोलीस शिपाई यश यादव, महिला पोलीस शिपाई माधुरी जाधव, या पथकाने कारवाई केली आहे.