Baldlapur Rape Case : बदलापूर अल्पवयीन मुलींवर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी
Badlapur Rape case Accused Akshay Shinde News : आरोपी अक्षय शिंदे याला 9 सप्टेंबर पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे
कल्याण :- बदलापूर येथील 2 अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषण Badlapur Rape Case प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे Akshay Shinde याला कोर्टाने सोमवारी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे आरोपी आता 9 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत राहणार आहे.
बदलापूर येथील एका शाळेत 2 चिमुकलींचे लैंगिक शोषण झाल्याची संतापजनक घटना मागील आठवड्यात समोर आली होती. त्याचे राज्यात सर्वत्र तीव्र पडसाद उमटले होते. पोलिसांनी या प्रकरणी शाळेतील अक्षय शिंदे नामक स्वच्छता कर्मचाऱ्याला अटक केली होती. त्याला कोर्टाने 24 तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. त्याला सोमवारी पुन्हा कल्याण येथील न्यायमूर्ती व्ही ए पत्रावळे यांच्या न्यायदालनात उभे करण्यात आले. तिथे पोलिसांनी त्याच्या कोठडीची मागणी केली. पण कोर्टाने पोलिसांची मागणी फेटाळत आरोपीला 14 दिवसांची म्हणजे 9 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली.
पोलिसांनी या प्रकरणी घटना घडली त्या शाळेचे अध्यक्ष, मुख्याध्यापिका व सचिव यांनाही आरोपी केले आहे. या तिघांनाही सध्या फरार घोषित करण्यात आले आहे. पोलिसांनी या प्रकरणात पॉक्सो कायद्यातील तरुतुदीही लावल्या आहेत. दुसरीकडे, या घटनेनंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. विरोधी पक्षांनी सरकारच्या विरोधात तसेच पोलिसांच्या ढिसाळ कामगिरीच्या निषेधार्थ अनेक ठिकाणी आंदोलने केली.