Namo Rojgar Melava Live Updates : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून बारामती बस स्थानक,पोलीस उपमुख्यालय कार्यालयाची पाहणी
Ajit Pawar in Baramati News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणारा उद्घाटन
पुणे :- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बारामती येथे उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक सोयी सुविधा युक्त बारामती बस स्थानक Baramati Bus Stand , पोलीस उपमुख्यालय, अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय, पोलीस वसाहत यांचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. तत्पूर्वी अजित पवारांनी या सर्व स्थानांची पाहणी करून संपूर्ण कार्यक्रमाचा आढावा घेतला आहे. Namo Rojgar Melava
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पहिल्यांदाच बारामती ते येणार असून ते आज महारोजगार मेळाव्यात उपस्थिती लावणार आहे. या मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार सुप्रिया सुळे आणि बारामती लोकसभेचे आणि विधानसभेचे सर्व आमदार उपस्थित राहणार आहे. ५५ हजार ७२ रिक्त पदे अधिसूचित करण्यात आली आहेत, तर आतापर्यंत ३३ हजारांवर युवक-युवतींनी रोजगारासाठी नावनोंदणी केली आहे. Namo Rojgar Melava
मेळाव्यादरम्यान उपस्थित कंपन्यांमार्फत रोजगार इच्छुक असणाऱ्या दहावी, बारावी, आयटीआय, पदविका, पदवीधर, पदव्युत्तर पदवी आदी पदवीप्राप्त उमेदवारांच्या मुलाखती घेऊन तेथेच त्यांना रोजगाराच्या संधी दिल्या जाणार आहेत. तथापि, शिक्षण पूर्ण झालेल्याच नव्हे तर आयटीआयच्या शेवटच्या वर्षात असलेल्या उमेदवारांनाही कंपन्या शिकाऊ योजनेंतर्गत रोजगार उपलब्ध करून देणार आहेत. त्यामुळे या योजनेसाठी पात्र विद्यार्थ्यांनीही मेळाव्यासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. हा मेळावा ३ मार्च रोजीही असल्याने अद्याप नोंदणी न केलेल्या नोकरी इच्छुक उमेदवारांनी
https://rojgar.mahaswayam.gov.in /#/register या संकेतस्थळावर आपली नावनोंदणी करून मेळाव्यासाठी उपस्थित राहावे. तसेच मेळाव्याच्या ठिकाणीही ऑफलाइन नोंदणीचीही व्यवस्था करण्यात आली आहे. दरम्यान, मेळाव्यात येणाऱ्या सर्व तरुण- तरुणींनी नोंदणी करून आपल्या भविष्याची वाट उज्वल करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.