Pune Crime News | पोलीस अधिकाऱ्यावर कोयता हल्ला करणारे आरोपी जेरबंद : गुन्हे शाखेने सोलापूर येथून घेतले ताब्यात

- गुन्हे शाखा सहायक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर यांची धडाकेबाज कामगिरी
- पोलीस आयुक्तांनी घेतली जखमी अधिकाऱ्याची भेट
पुणे, दि. २६ ऑगस्ट, मुबारक जिनेरी (महाराष्ट्र मिरर) Pune Crime News
ससाणे नगर रेल्वे गेट शेजारी रामटेकडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर वानवडीचे सहायक पोलीस निरीक्षक रत्नदीप गायकवाड यांच्यावर कोयत्याने प्राणघातक हल्ला करणाऱ्या दोन सराईत आरोपींना गुन्हे शाखेकडून ताब्यात घेण्यात आले आहे. Pune Police गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त पिंगळे, सपोआ सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेकडून संयुक्त कारवाई करण्यात आली.
आरोपी १. निहालसिंग मन्नूसिंग टाक, वय -१८, रा. तुळजाभवानी वसाहत, कॅनॉल जवळ, हडपसर, पुणे व २. राहूलसिंग उर्फ राहुल्या रवींद्रसिंग भोंड, वय – १९, रा. तुळजाभवानी वसाहत, कॅनॉल जवळ, हडपसर, पुणे मूळ : नाशिक यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

दुचाकी अपघातातील भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या सपोनि रत्नदीप गायकवाड यांच्यावर निहालसिंग टाक व राहूलसिंग भोंड यांनी कोयता फेकून जखमी केले होते. आरोपी निहालसिंग टाक व राहूलसिंग भोंड हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर तब्बल २० गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळत आहे. थेट पोलिस अधिकाऱ्यावर हल्ला झाल्याने पुणे पोलिसांची प्रतिमा डागाळली होती. आरोपींना अटक करणे अनिर्वाय झाले असताना पुण्यातील गुन्हेगारीचा सातबारा तोंडपाठ असणारे धडाकेबाज, राष्ट्रपदी पदक प्राप्त गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर यांनी तपासाची चक्रे फिरवत आरोपींना सोलापूर येथून ताब्यात घेण्यासाठी महत्वाची कामगिरी बजावली.

पुण्यातील गुन्हेगारीचा सातबारा तोंडपाठ असणारे सपोआ सतीश गोवेकर ACP Satish Govekar या महिन्यात नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत. दांडगा अभ्यास, गुन्हेगारांची कुंडली, माफियांचे नेटवर्क मोडण्यासाठी सतीश गोवेकर प्रसिद्ध आहेत. सतीश गोवेकर सेवानिवृत्त झाल्यानंतर पुणे पोलीस दलात मोठी पोकळी निर्माण होणार आहे.
पोलीस आयुक्तांनी घेतली जखमी अधिकाऱ्याची भेट
