Attack on Pune Police | भयावह ! वानवडी पोलीस अधिकाऱ्यावर कोयत्याने हल्ला : कायदा सुव्यवस्था धोक्यात
पुणे, दि. २५ ऑगस्ट, मुबारक जिनेरी (महाराष्ट्र मिरर) Attack on pune police
पुणे शहरात गुन्हेगारांचा उद्रेक झाला असून कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली आहे. जनतेचे रक्षण करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावरच थेट कोयता हल्ला झाल्याने परिस्थिती भयावह झाली आहे. वानवडी हद्दीतील सय्यद नगर शेजारील पेट्रोल पंपालगत रस्त्यावर वाहन अपघात झाला असताना भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या पोलीस अधिकाऱ्यावर कोयता हल्ला झाला आहे.
सहायक पोलीस निरीक्षक रत्नदीप गायकवाड Api Ratnadeep Gaykwad असे जखमी झालेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे.
भाडंण सोडविताना थेट पोलीस अधिकाऱ्याच्या डोक्यात कोयता मारण्यात आल्याचे सूत्रांकडून समजते. दरम्यान महामंडवाडी पोलीस चौकी येथे प्रभारी अधिकारी म्हणून सहायक पोलीस निरीक्षक रत्नदीप गायकवाड कार्यरत असल्याची माहिती मिळते. थेट पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला करण्याचे धाडस गुन्हेगार करत असल्याने सामान्य जनतेची अवस्था काय असेल याचा विचार भयावह आहे.
वानवडी हद्दीतील सय्यद नगर परिसरात यापूर्वी २ खून झाले आहेत. एकूणच या परिसरात व रामटेकडी परिसरात गुन्हेगारी बोकाळली आहे. Pune Police वानवडी पोलिसांनी रस्त्यावर पायी गस्त वाढविली असताना देखील गुन्हेगार भीती बाळगत नसल्याचे दिसून येत आहे.