Helicopter Crashed : पुणे जिल्ह्यातील पौड भागात हेलिकॉप्टर पडलं, खराब हवामान कारण होतं का?
•Helicopter Crashed In Pune हेलिकॉप्टरचा चित्त थरारक अपघात मोबाईल मध्ये कैद
पुणे :- पुणे जिल्ह्यातील पौड भागात हेलिकॉप्टर कोसळले. पुण्यात मुसळधार पाऊस पडत असून वाराही जोरात आहे. Helicopter Crashed जोराचा वारा किंवा खराब हवामानामुळे ही घटना घडली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. तसेच मुंबईच्या ग्लोबल कंपनीचे हेलिकॉप्टर असून मुंबईहून विजयवाडा येथे जाणार होते. यामध्ये पायलट सह तीन प्रवासी प्रवास करत होते. अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. Helicopter Crashed
पुण्यामध्ये हेलिकॉप्टरचा अपघात मोबाईल फोनमध्ये कैद झाले असून मिळालेल्या माहितीच्या आधारे हेलिकॉप्टर चे नाव AW139 असे असून ते मुंबईतील ग्लोबल हेक्ट्रा कंपनीचे आहे. हेलिकॉप्टर मुंबईहून विजयवाडा येथे प्रवास करत असल्याची माहिती समोर आली आहे. Helicopter Crashed यामध्ये हेलिकॉप्टर मधून प्रवास करणाऱ्या चारही जणांची प्रकृती स्थिर असून हेलिकॉप्टरच्या पायलट जखमी झाला आहे. यांच्यावर पेशंट हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहे. हेलिकॉप्टरचा पायलट आनंद कॅप्टन प्रवासी दिर भाटिया,अमरदीप सिंग, एस पी राम यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहे. दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नसल्याचे सांगण्यात आले आहे. Helicopter Crashed