मुंबई

Bhiwandi Crime News : पत्नीने प्रियकराच्या मदतीने काढला पतीचा काटा

•Wife Killed Husband in Bhiwandi पतीचे मृतदेह बॅगेमध्ये भरून खाडीत फेकले

भिवंडी :- पती-पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना भिवंडीत समोर आली आहे. प्रियकर सोबतच्या प्रेमात पतीचा अडथळा ठरत असल्याने पतीचा काटा काढण्याकरिता पत्नीने प्रियकराच्या मदतीने धारदार शस्त्राने पतीवर प्राण घातक हल्ला करत त्याला जीवे ठार मारले.Bhiwandi Crime News मृतदेहाची ओळख पटू नये तसेच पुरावे नष्ट करण्याकरिता प्रियकराच्या मदतीने पत्नीने मृतदेह बॅगेमध्ये भरून खाडीत फेकल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहेत. बलराम उर्फ शेखर लक्ष्मण मिश्रा (27 वर्ष) असे मृत पतीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बलराम उर्फ शेखर लक्ष्मण मिश्रा यांची हरविल्याची तक्रार नारपोली पोलीस ठाण्यात दाखल होती. या तपासाचा शोध घेत असताना पोलिसांनी धक्कादायक प्रकार उघडकीस आणला आहे.बलराम उर्फ शेखर लक्ष्मण मिश्रा, (27 वर्ष, रा.रेतीबंदर रोड, काल्हेर) त्यांची पत्नी 25 वर्ष हिने व तीचा प्रियकर अनुभव रामप्रकाश पांडे ( 23 वर्ष रा.जि.सुल्तानपुर, राज्य उत्तरप्रदेश ) यांनी पतीचा काटा काढण्याकरिता धारदार शस्त्राने बलराम मिश्रा‌ याच्यावर वार करून जिवे ठार मारले आहे. Bhiwandi Crime News मृताचे पुरावा नष्ट करण्यासाठी बॅगमध्ये भरून कशेळी खाडीवरील ब्रिजवरून पाण्यात टाकले. या प्रकाराबाबत सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादी वरून आरोपीविरूध्द गुन्हा भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 103(1),238,3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन, आरोपी अनुभव रामप्रकाश पांडे, (23 वर्ष), यासअटक करण्यात आली असुन,आरोपी पत्नीचा (25 वर्ष) हिचा नारपोली पोलीस शोध घेत आहेत. गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कदम हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0