Pune Corporation : चक्क पुणे महापालिकेतच माजी नगरसेविकेचा विनयभंग ! परेश गुरव याच्या विरोधात विनयभंग, ॲट्रॉसिटीचा गुन्हा
पुणे, दि. 24 ऑगस्ट, महाराष्ट्र मिरर : Pune corporation
पुणे महापालिकेच्या pune corporation भवन विभागात भाजपच्या माजी नगरसेविकेचा विनयभंग, तसेच अश्लील शिवीगाळ केल्याप्रकरणी परेश गुरव विरोधात शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बाणेर भागात आदिवासी मुलींच्या वसतिगृहाचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण व्हावा, यासाठी माजी नगरसेविकेकडून प्रयत्न करण्यात येत आहे. त्यावेळी या ‘खास’ व्यक्तीने अश्लील शिवीगाळ करत विनयभंग केल्याचे माजी नगरसेविकेने फिर्यादीत म्हटले आहे.
परेश गुरव (रा. साधना सोसायटी, हडपसर)असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. त्याचेवर पुढील कलमानुसार पोलिसांनी FIR नोंदविला आहे.
1भारतीय न्याय संहिता (बी एन एस), 2023- 74,
2 भारतीय न्याय संहिता (बी एन एस), 2023-79
3 भारतीय न्याय संहिता (बी एन एस), 2023 296(a)
4 भारतीय न्याय संहिता (बी एन एस), 2023 351(2)
5 अनुसूचीत जाती आणि अनुसूचीत जमाती(अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम, १९८९-3(1)(d)
6अनुसूचीत जाती आणि अनुसूचीत जमाती(अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम, १९८९-3(1)(f)
7 अनुसूचीत जाती आणि अनुसूचीत जमाती(अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम, १९८९-3(1)(h)
8अनुसूचीत जाती आणि अनुसूचीत जमाती(अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम, १९८९-3(1)(r)
9अनुसूचीत जाती आणि अनुसूचीत जमाती(अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम, १९८९-3(1)(e)
माजी नगरसेविकेने जबाबात म्हटले आहे कि,’मी समक्ष शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे हजर राहुन जबाब देते की मी …या विभागातुन माजी नगरसेविका आहे. दि. 22/08/2024 रोजी 17.45 वा चे दरम्यान पुणे महानगरपालिका येथे यापूर्वीआदिवासी मागासवर्गीय मुलींचे वसतिगृहाचे राहिलेल्या बांधकामाची माहिती घेण्यासाठी भवन विभाग पुणे मनपा येथे आले असता संबंधित अधिकारी यांचेकडुन वसतिगृहाबाबत माहिती घेऊन दालनाच्या बाहेर पडत असताना समोरून माझे ओळखीचे परेश गुरव रा. हडपसर साधना सोसायटी पुणे मो.नं.(… ) हे ये
… तु आदिवासी, मागासवर्गीय वसतिगृह कशी उभी करते तेच मी बघतो तुझ्या …. तुझी …, … शिवीगाळ करून माझ्या अंगावरती हात टाकुन माझ्या हातास धरून सदरच्या ऑफिसमध्ये ओढत नेऊन आयुक्ताकडे जाऊन तुझे आदिवासी मागासवर्गीय मुलींचे वसतिगृह कसे तयार होते तेच बघतो माझ्या पाठीमागे मराठा समाजाचे अरविंद शिंदे आहेत मी त्यांचा पी ए म्हणून काम करतो माझे कोणी काही वाकडे करू शकत नाही …. तु लक्षात ठेव असे बोलले. त्यावेळी सदर ऑफिसचे बाहेर पब्लिक व ऑफिसचे कर्मचारी गोळा झाले त्यावर मी त्यांना तुम्ही काका असे का वागत आहात तुमचा काय संबंध असे विचारता XXXX आतमध्ये ये तुझा काय संबंध आहे ते आतमध्ये सांगतो आमचा सांगतो आमचा आवाज ऐकुन मनपा येथील सुरक्षारक्षक तेथे आले. त्यांनी मला त्याच्या तावडीतुन सोडवले तरी तो मला शिवीगाळ करीत होता. तसेच तो व मला बाजुला घेऊन मला पाणी पिण्यास दिले तरीही परेश गुरव हा मला बघुन घेण्याची धमकी देत होता. त्यांनी मला मारण्याची धमकी देऊन तो तेथुन निघुन गेला. नमुद इसमाने कार्यालयात माझा हात वाईट उद्देशाने ओढल्याने माझ्या मनास लज्जा निर्माण झाली. आज दि.22/08/2024 रोजी 17.45 वा चे सुमारास भवन विभाग पुणे मनपा येथे इसम नामे परेश छबनराव गुरव (शिंदे) याने माझ्या हातास धरून मला भवन विभागाचे ऑफिसमध्ये ओढुन मला ये XXX तु आदिवासी, मागासवर्गीय वसतिगृह कशी उभी करते तेच मी बघतो तुझ्या XXXX,XXXX,तुझी XXXX,XXX अशी अश्लिल शिवीगाळ करून मला मारण्याची धमकी दिली इसम नामे परेश गुरव याने मला दिलेल्या शिवीगाळ मुळे माझ्या मनास लज्जा उत्पन्न झाली म्हणुन माझी त्याच्या विरूद्ध कायदेशीर तक्रार आहे. हा जबाब माझे सांगणे प्रमाने लिहला असुन वाचुन पाहिला असता बरोबर व खरा आहे
वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात येत आहे.