Ajit Pawar : जम्मू-काश्मीरच्या निवडणुकीच्या रिंगणात अजित पवार यांची राष्ट्रवादी उतरणारा
Ajit Pawar NCP Announced 25 Star Campaigners : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून 25 स्टार प्रचारकांची यादी जाहीर
मुंबई :- लोकसभेनंतर आता देशाचे लक्ष देशातील वेगवेगळ्या पाच राज्यांच्या आगामी होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीवर लागले आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने Election Commission दोन राज्यांच्या निवडणुका तारखा जाहीर केल्या आहेत. यामध्ये हरियाणा आणि जम्मू काश्मीर Jk Election येथे निवडणूक होणार आहे. जम्मू-काश्मीरच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट NCP Ajit Pawar Group रिंगणात उतरल्याचे पाहायला मिळत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस कडून जम्मू काश्मीर निवडणुकीमध्ये 25 तार प्रचारकांचे यादी जाहीर केली आहे.
महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी राज्यात अजित पवार गटाकडून जनसमान यात्रा काढण्यात आली आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार देखील या यात्रेदरम्यान ठिकठिकाणी जाऊन सभा घेताना दिसत आहेत. मात्र आता अजित पवारांचा पक्ष महाराष्ट्र व्यतिरिक्त थेट जम्मू-काश्मीरमध्ये देखील विधानसभेची निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे.
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 25 स्टार प्रचारकांची यादी देखील जाहीर केली असल्याची माहिती पक्षाचे प्रभारी सरचिटणीस ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी दिली आहे. या यादीमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री छगन भुजबळ, एस. आर. कोहली, ब्रिजमोहन श्रीवास्तव आणि जम्मू-काश्मीर प्रदेशाध्यक्ष डॉ. तारिक रसूल व इतरांचा समावेश आहे.
काय म्हणाले ब्रिजमोहन श्रीवास्तव?
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीविषयी बोलताना श्रीवास्तव म्हणाले, “अनुभवी नेत्यांच्या मार्गदर्शनात जम्मू-काश्मीरमध्ये एक प्रभावी मोहीम राबवली जाणार आहे. या मोहिमेद्वारे तेथील सर्वसामान्य जनतेच्या समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.”