मुंबई

Jitendra Awhad : सुसंस्कृत बदलापूरचे नाव आता सत्ताधारी आणि पोलिसांनी “बलात्कारपूर”

• राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते Jitendra Awhad यांनी बदलापूर घटनेवर ट्विट करत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला

मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी बदलापूर येथील दोन चिमुकल्यांवर झालेल्या बलात्कार प्रकरणी आपली भावना व्यक्त केली आहे. ट्विट करत जितेंद्र आवड यांनी सत्ताधारी आणि पोलिसांवर निशाणा साधला आहे.सुसंस्कृत बदलापूरचे नाव आता सत्ताधारी आणि पोलिसांनी “बलात्कारपूर” करायला घेतले आहे. असं संताप व्यक्त केला आहे.

आमदार जितेंद्र आव्हाड यांचे ट्विट

सुसंस्कृत बदलापूरचे नाव आता सत्ताधारी आणि पोलिसांनी “बलात्कारपूर” करायला घेतले आहे की काय, असा संशय निर्माण होऊ लागला आहे. बदलापुरात शाळेत दोन चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार झाल्याचे उघडकीस आलेले असतानाच आपल्या राज्याची प्रतिमा आंतरराष्ट्रीय स्तरावरही बदनाम झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पोट भरण्यासाठी नेपाळहून बदलापुरात आलेल्या एक् नेपाळी कुटुंबातील अकरा वर्षाच्या चिमुरडीवर इमारतीचे काम करणाऱ्या ठेकेदाराने आईबापाला ठार मारण्याची धमकी देत तसेच तिला मारहाण करीत जुलै महिन्यात बलात्कार केला. ही चिमुरडी गर्भवती राहिल्यानंतर गुन्हा दाखल करून जे.जे. रूग्णालयात गर्भपात करण्यात आला. नराधमाची पूर्ण माहिती असतानाही त्याला पोलिसांनी अटक केली नाही. त्यामुळे ही मुलगी रूग्णालयात असताना मुलीच्या कुटुंबियांना सुरूवातीला पैशांचे अमीष दाखवण्यात आले. पण, ते या अमीषाला न बधल्याने नंतर धमक्या देण्यास सुरूवात झाली. हे कुटुंब रूग्णालयात असताना त्यांचे बदलापुरातील घर पाडण्यात आले.

या नेपाळी कुटुंबाने पोलिसांच्या पायावर डोके ठेवून नराधमाला अटक करण्याची विनंती करून न्यायाची मागणी केली. पण, पोलिसांनी नराधम फरार आहे, आम्ही काय करणार? अशी उत्तरे दिली. अखेर आपल्या दुसऱ्या मुलीच्या जीवाच्या भयाने हे नेपाळी कुटुंब दहा दिवसांपूर्वी नेपाळला गेले आहे. आताही त्या कुटुंबाला गुन्हा मागे घे, असे सांगत धमकावले जात आहे.

हे काय चालले आहे, सुसंस्कृत महाराष्ट्राची अशी बदनामी जगभर होऊ लागली आहे. गरीब घरातील मुलींधा बापजाद्यांची संपत्ती समजून त्यांच्या इभ्रतीशी खेळत आहेत आणि हे सत्ताधारी उघड्या डोळ्यांनी बघत आहेत. पोलीस आजही त्या नेपाळी कुटुंबाला फोन करून धमकावत आहेत. आता जर अशा घटनांना पायबंद घालण्याऐवजी पोलीस पीडितांना धमकावत असतील तर कायद्याचे राज्य राहिले आहे का?
या पापाला तो नराधम जेवढा जबाबदार आहे तेवढेच सत्ताधारी आणि पोलीसही जबाबदार आहेत. आज सत्ताधारी आणि पोलीस नराधमाला वाचवतील पण नियती कधीच माफ करणार नाही !

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0