Uddhav Thackeray : महाराष्ट्र उद्या दुपारी दोन वाजेपर्यंत बंद,उद्धव ठाकरे यांचे आवाहन बंद मध्ये सर्वांनी सहभागी व्हा..
Uddhav Thackeray News : महाविकास आघाडी कडून उद्या (24 ऑगस्ट) राज्य बंदीचे हाक, जात,पात,धर्म ओलांडून बंदमध्ये सहभागी व्हा उद्धव ठाकरेकडून आवाहन
मुंबई :- 24 ऑगस्ट उद्याचा बंद आम्ही नागरिकांच्या वतीने करत असून तेदेखील सहभागी होती. जात, पात, धर्म या कक्षा ओलांडून सहभागी व्हा अशी विनंती उद्धव ठाकरे यांनी केली आहे. Uddhav Thackeray on Maharashtra Bandh हा सामाजिक प्रश्न असून, आजपर्यंत झालेल्या बंदप्रमाणे असेल. हा बंद कडकडीत असायला हवा. पण या बंदमध्ये अत्यावश्यक सेवा सुरु राहतील,” असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे. पुढे ते म्हणाले की, “सणासुदीचे दिवस आहेत, गपणती बाप्पा येणार आहेत, दहीडंडीचा सराव सुरु आहे. त्यामुळे उद्याचा बंद दुपारी 2 वाजेपर्यंत सर्वांना पाळावा असं माझं आवाहन आहे”.
लोकल आणि बस उद्या बंद ठेवायला हव्यात. कारण हा बंद राजकीय हेतून प्रेरित नाही. हा प्रत्येकाच्या मनातला, ह्रदयातला, घरातला प्रश्न आहे. त्यामुळे लोकल, बस बंद ठेवायला हव्या,” असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे.उद्याच्या बंदचं यश-अपयश हे राजकारणात मोजण्याचं कारण नाही. तो बंद विकृती विरुद्ध संस्कृती आहे. राज्यातील सुजाण, सुसंस्कृत नागरिकांनी 2 वाजेपर्यंत कडकडीत बंद पाळावा. आम्ही तुमच्या कारभारावर, माता-भगिनींच्या भवितव्याबद्दल चिंता व्यक्त करत आहोत हे सरकारला दाखवलं पाहिजे असंही त्यांनी सांगितलं.
बदलापुरातील आंदोलकांना दोरखंडाने बांधून नेले. त्यांच्यावर दाखल केलेले गुन्हे सरकारने मागे घ्यायला हवे, अशी मागणीही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली.नराधमांच्या पाठीराख्यांनी उद्याच्या बंदमध्ये सहभागी होऊ नये, तर उद्या दुपारी दोन वाजेपर्यंत सर्वांनी बंद पाळायला हवा. दुकानदारांनाही मुली आहेत, त्यांनी बंदमध्ये सहभागी व्हायला हवे. लोकल आणि बससेवा बंद ठेवायला हव्या, असे आवाहन त्यांनी केले.