Nashik Central Jail | नाशिक मध्यवर्ती कारागृह परिक्षेत्रामध्ये वृक्ष लागवड उपक्रम – अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर

- पर्यावरण संवर्धन व संरक्षणाचा दिला संदेश
नाशिक, दि. २२ ऑगस्ट, (मुबारक जिनेरी) महाराष्ट्र मिरर : Nashik Central Jail
ग्लोबल वॉर्मिंग, पर्यावरणाचा ढासळलेला समतोल राखण्यासाठी अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर (IPS Dr. Jalindar Supekar) यांनी नाशिक मध्यवर्ती कारागृह परिक्षेत्रामध्ये वृक्ष लागवड उपक्रम राबवित पर्यावरण संवर्धन व संरक्षणाचा संदेश दिला आहे.
पृथ्वीवरील वातावरणात सातत्याने बदल होत आहे. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळतो आहे. पर्यावरणाचा प्रश्न सर्व जगाला भेडसावत आहे. संवर्धन ही आजच्या काळाची मोठी गरज आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण व त्यांचे मानवाने आपल्या अतिरेकी महत्वाकांक्षेसाठी सिमेंटची जंगलं वसवली, मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल केली. याचाच परिणाम ग्लोबल वॉर्मिंगचा प्रश्न आज जगाला भेडसावत आहे. वातावरण बदलामुळे पावसाची अनिश्चीतता वाढलीय. वाढती लोकसंख्या, वाहनांचा अति वापर यामुळे निर्माण होणा-या प्रदूषणामुळे शहरात श्वास घेणे कठीण झालेले आहे. शुध्द हवा, ऑक्सिजन हवा असेल तर झाडांशिवाय पर्याय नाही. वृक्ष आपल्याला फक्त पाने, फुलेच देत नाहीत, तर आपल्याला जगण्याची उर्जा देतात.

अपर पोलिस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे-१ यांचेकडून नेहमीच पर्यावरण पूरकतेचा संदेश देऊन राज्यातील कारागृहांना वृक्ष लागवडीसाठी निरंतर प्रोत्साहित करण्याचे काम केले जात आहे.
त्याचाच भाग म्हणून पावसाळयाचे औचित्य साधून दिनांक २०.०८.२०२४ रोजी विशेष पोलिस महानिरीक्षक तथा कारागृह उपमहानिरीक्षक, नाशिक विभाग, नाशिक जालिंदर सुपेकर (भा.पो.से.) यांचे हस्ते नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहास मोठ्या प्रमाणात लाभलेल्या कारागृह परिक्षेत्रामध्ये आंवा, नारळ, तसेच औषधी आणि इतर फळ वृक्षांचे रोपण करण्यात आले. यामुळे कारागृह शेतीची बांधबंदिस्ती होणार आहे. तसेच जमिनीची धूप थांबण्यास मदत होईल. नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहाचे परिक्षेत्रावर सुमारे २८०० वृक्षांची लागवड करण्यात येणार असुन १३५० वृक्ष लागवड पुर्ण झालेली आहे. महोदयांनी महाराष्ट्र राज्यातील सर्वच कारागृहांमध्ये मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्याचा मानस व्यक्त केला आहे. तसेच नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहाच्या शेती परिक्षेत्राचा विकास बघून समाधान व्यक्त करुन अधिकारी/कर्मचारी यांची प्रशंसा केल्याने अधिकारी/कर्मचारी यांनी शेती क्षेत्रामध्ये केलेल्या कामाचे इ गालेली प्रशंसा बघून अधिकारी/कर्मचारी यांचा आनंद व्दिगुणती झाल्याचे दिसून आले.
सदर वृक्षारोपण कार्यक्रमाप्रसंगी कारागृह अधीक्षक श्रीमती अरुणा मुगूटराव, अति. अधीक्षक श्री. आर. आर. देशमुख, उप-अधीक्षक एस. व्ही. चिकणे वरीष्ठ तुरुंगाधिकारी एस. बी. खारतोडे आणि शेती विभागातील संबंधीत अधिकारी आणि कर्मचारी व बंदी उपस्थित होते.
तसेच महोदयांनी कारागृहातील विविध विभागात संचारफेरी घेऊन कारागृहातील बंदी आणि अधिकारी/कर्मचारी यांच्या समस्या जाणून घेतल्या व मौलिक मार्गदर्शन केले