Navi Mumbai Crime News : हत्या.. अज्ञात मारेकरी, सीसीटीव्ही फुटेज् या सर्वांचा उलगडा
सीसीटीव्ही फुटेजने हत्येचं गूढ उलगडण्यात नवी मुंबई पोलिसांना मोठी मदत
नवी मुंबई :- सिनेमामध्ये ज्याप्रमाणे एखाद्या छोट्याशा गोष्टीवरून एखाद्या मृतदेहाचा उलगडा केला जातो,त्याचप्रमाणे पोलिसांकडे कणभरही माहिती नसताना केवळ सीसीटीव्हीच्या मदतीने एका अज्ञात मृतदेहाचा खुनाचा उलगडा करण्यात नवी मुंबई पोलिसांना यश आले आहे. रबाळे एमआयडीसी पोलिसांच्या हद्दीत ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मॅकडॉनल्ड्स रेस्टॉरंट बेलापूर ते ठाणे या रोडवर सुशीलकुमार रामसजीवन बिंद (25 वर्ष,रा.डंपींग रोड, मुलुंड पश्चिम, मूळ उत्तर प्रदेश) याच्यात खुनाबद्दलची नोंद पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशीलकुमार हा 1 ऑगस्टच्या दरम्यान मुलुंड येथील आपल्या नातेवाईकांकडे आला होता. 4 ऑगस्टच्या दरम्यान तो कळवा,ठाणे येथे मोबाईल दुरुस्ती करण्याकरिता जात असल्याचे नातेवाईकांना सांगून गेला. 5 ऑगस्ट रोजी घटनास्थळीच्या जागेवर पडलेल्या मृतदेहाच्या खिशातील मोबाईल नंबरच्या आधारे मयत व्यक्तीची ओळख पटली होती. तसेच ही घटना घडली त्यावेळी प्रत्यक्ष कोणी तिथे साक्षीदार नव्हते.मोबाईल फोन वापरत नसल्याने ही घटना निश्चितच वेळ घेणारी आणि आरोपीचा शोध घेण्यास पोलीस मोठे आव्हान होते. नवी मुंबई पोलिसांनी हे प्रकरण गुन्हे कक्ष-1 यांना गुन्ह्याचा समांतर तपास करण्यास सांगितले.
पोलिसांनी कोपरखैरणे ते घनसोली रोडच्या बाजूस असलेल्या सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी केली. सुशीलकुमार हा रबाळे ते घणसोली स्टेशन कडे जाणाऱ्या मार्गाने पायी चालत असल्याचा एका सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले होते. त्याचवेळी एक संशयित मोटरसायकल तिच्या खाली-वर दोन लाईटी असलेली मोटरसायकल उभी असल्याचे पोलिसांना दिसली. सुमारे दहा मिनिटानंतर मोटरसायकल घटनास्थळावरुन निघून गेली असल्याचे पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसले. गुन्हे शाखा कक्ष-1 यांनी संशयित मोटरसायकलचा ठाणे, बेलापूर रोड, कोपरखैराणे, घणसोली या परिसरातील पंधरा दिवसात जवळपास शंभर ते दीडशे सीसीटीव्ही फुटेज पाहून पोलिसांना एक संशयित आरोपी दिसला. या संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली असता गुन्ह्याची कबुली आरोपीने दिली आहे. आरोपीचे नाव समीर अमजीत शेख, (23 वर्ष, रा. तळवली गाव, घनसोली, नवी मुंबई) आहे. पोलिसांनी आरोपीकडून मोटरसायकल जप्त केली असून आरोपीने खुन का केला आहे? याची चौकशी पोलिसांकडून करण्यात येत आहे.
पोलीस पथक
पोलीस आयुक्त, नवी मुंबई मिलींद भारंबे, पोलीस सह आयुक्त, संजय येनपुरे, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, दीपक साकोरे, तसेच पोलीस उप आयुक्त, गुन्हे शाखा, अमित काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा,अजयकुमार लांडगे,
गुन्हे शाखा कक्ष-1 चे पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश बनकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश पाटिल, पोलीस उपनिरीक्षक सचिन बाराते, पोलीस उपनिरीक्षक प्रशांत कुंभार, सहाय्यक फौजदार म्हात्रे,खैरे, पोलीस हवालदार विश्वास पवार, दिपक पाटील, बालाजी चव्हाण, अतिश कदम, वाघ,लक्ष्मण कोपरकर, दिपक मोरे, निलेश पांचाळ, विश्वास भोईर, पोलीस नाईक रविंद्र सानप, पोलीस शिपाई विशाल सावरकर यांनी केली आहे.