Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे यांचे मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांना पत्र, ही केली मागणी
Aaditya Thackeray Write Letter TO BMC Commissioner : आदित्य ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिकेच्या भरतीतील काही जाचक अटी रद्द करण्यात यावा अशी मागणी केली आहे.
मुंबई :- बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून BMC सर्वच पदाकरिता मेगा भरती घेण्यात येत आहे. जवळपास बाराशे ते अठराशे पदावर ही भरती घेतली जात असल्याचे म्हटले जात आहे. परंतु आता या भरती संदर्भात शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे Aaditya Thackeray यांनी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांनाच BMC Commissioner पत्र लिहिले आहे. आणि त्यांनी कार्यकारी सहाय्यक पदासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे मात्र या नमूद अटीमध्ये काही जाचक अटी आहेत की ज्यामुळे दोन ते तीन लाख मुला-मुलींना परीक्षेचा अर्ज भरता येणार नाही त्यामुळे या अटी रद्द व्हाव्यात याकरिता मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांना आदित्य ठाकरे यांनी पत्र लिहिले आहे.
आदित्य ठाकरे आपल्या पत्रात म्हणाले की,
20 ऑगस्ट 2024 रोजी, बृहन्मुंबई महानगरपालिकतर्फे कार्यकारी सहाय्यक या पदांसाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. सदर जाहिरातीत नमूद केलेल्या अटींमध्ये “पहिल्या प्रयत्नात पदवी” उत्तीर्ण असणे ही जाचक अट घातली आहे. या कारणास्तव महाराष्ट्रातील 2 ते 3 लाख मुला-मुलींना परीक्षेचा अर्ज ही भरता येणार नाही व त्यांच्यासाठी ही अट अन्यायकारक आहे. सध्या महाराष्ट्रातील बेरोजगारीचा भयावह प्रश्न पाहता आपण कृपया या अटीच्या पुनरावलोकनासाठी योग्य ती कारवाई करावी व या अटीत बदल करावा. जेणेकरून अधिकाधिक योग्य आणि सक्षम उमेदवारांना या पदासाठी संधी मिळेल आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षमतेत सुधारणा होईल, ही विनंती.आपल्या सकारात्मक प्रतिसादाची अपेक्षा करत आहे.