क्राईम न्यूजमुंबई

Nalasopra Crime News: नालासोपारा गुन्हे प्रकटीकरण विभागाची कारवाई ; घरफोडी करणाऱ्या दोन आरोपींना अटक

Nalasopra Crime Branch Arrested Thief : घरफोडी करणाऱ्या आरोपी महिलेसह तिच्या मित्राला अटक करण्यात नालासोपारा गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांना यश मिळाले आहे. चोरलेले सोन्याचे दागिने मुथुड फायनान्स मध्ये ठेवले होते गहाण

नालासोपारा :- नालासोपाराच्या गुन्हे प्रकटीकरण Nalasopra Crime Branch विभागाने कारवाई करत दोन आरोपींना चोरीच्या प्रकरणात अटक करण्यात यश आली आहे. पोलिसांनी एका महिलेला आणि तिचा मित्र याला अटक केली आहे. मुथूट फायनान्स मध्ये चोरलेल्या दागिने गहाण ठेवल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. नालासोपारा पोलीस ठाण्यात Nalasopra Police Station कलम 305 (अ),331(3) भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत गुन्हा दाखल असलेल्या एका प्रकरणातील दोन आरोपींना गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या पोलिसांनी अटक केली आहे. Nalasopra Latest Crime News

राहुल इंटरनॅशनल शाळेच्या बाजूला असलेल्या जय अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या यशस्वी मुडकर (35 वर्ष) यांच्या घरी 24 जुलैला सकाळी चोरी झाली होती. चोरट्याने बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत लोखंडी कपाटातून 4 लाख 21 हजार 640 रुपये किंमतीचे सोन्याचांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली होती. याप्रकरणी नालासोपारा पोलिसांनी 25 जुलैला घरफोडीचा गुन्हा दाखल केला होता. पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून घरफोडी चोरीचे प्रमाण वाढल्याने वरिष्ठांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी गुन्हयाचा तपास सुरु केला. घटना स्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तसेच बातमीदाराच्या माहितीनुसार तपास करण्याचा प्रयत्न केला. परंतु काहीएक माहीती हाती लागली नाही. त्यामुळे बिल्डींगच्याच व्यक्तीने चोरी केली असल्याचा दाट संशय निर्माण झाला. त्याप्रमाणे यशस्वी यांचेकडे वारंवार चौकशी करुन बिल्डींगमधील संशयीत व्यक्तीकडे चौकशी करण्यास सुरुवात केली. Nalasopra Latest Crime News

शेजारी राहणारी आरोपी महीला निधी भावेश माळी (27 वर्ष) हिच्याकडे पोलीस तपासाचे सर्व मार्गाचा अवलंब करुन बुध्दी चातुर्याने कौशल्यपूर्ण तपास केला असता, तीने सदरचा गुन्हा केल्याची कबूली दिली. तसेच गुन्ह्यातील काही दागिने तीचा मित्र प्रविण रोकडे (39 वर्ष) याच्याकडे देऊन ते दागिने मुथ्युट फायनान्स कंपनीत ठेवून त्यावर पैसे उचलल्याचे दिसून आले. आरोपी महिला निधी माळी व प्रवीण रोकडे या दोघांना 15 ऑगस्टला संध्याकाळी अटक केले. आरोपींकडून 86.98 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, चांदीचे पैंजण, लहान मुलीचे कमरेची चेन व रोख रक्कम असा 4 लाख 76 हजार 334 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करुन गुन्हा उघडकीस आणला आहे.गुन्हयाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेद्र चंदनकर, नालासोपारा पोलिस ठाणे मि.भा.व.वि.पोलीस आयुक्तालय हे करित आहेत. Nalasopra Latest Crime News

पोलीस पथक
मधुकर पाण्डेय, पोलीस आयुक्त, दत्तात्रय शिंदे, अपर पोलीस आयुक्त, जयंत बजबळे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-03, राजेंद्र लगारे, सहायक पोलीस आयुक्त नालासोपारा यांचे मार्गदर्शनाखाली विजयसिंह बागल, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, नालासोपारा पोलीस ठाणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र चंदनकर, पोलीस उपनिरीक्षक योगेश मोरे, सहाय्यक फौजदार हिरालाल निकुंभ, पोलीस हवालदार किशोर धनु, प्रशांत साळुंके, अमोल तटकरे, पोलीस अंमलदार कल्याण बाचकर, राजेश नाडुलकर, प्रेम घोडेराव, बाबासाहेब बनसोडे, प्रताप शिंदे यांनी केलेली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0