मुंबईमहाराष्ट्र

Maharashtra Band : 24 ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक..!!

Maha Vikas Aghadi on Badlapur Crime Case : 24 ऑगस्टला महाराष्ट्र बंदची Maharashtra Band हाक राज्याचे महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे

मुंबई :- महाविकास आघाडीच्या बैठकीत Maha Vikas Aghadi 24 ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणी ही महाराष्ट्र बंदची Maharashtra Band हाक देण्यात आली आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेला 24 ऑगस्ट च्या दिवशी बंदमध्ये सहभागी होण्याचेही आवाहन केले आहे.

बदलापूर शाळेतील दोन चिमुकल्यावर झालेल्या लैंगिक शोषणाच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून राज्य बंदची घोषणा करण्यात आली आहे. बदलापूर लैंगिक शोषणाच्या आरोपीला कठोर शिक्षा व्हावी याकरिता राज्य बंदीची घोषणा केली आहे.

बदलापूर मध्ये काल झालेल्या आंदोलनात तब्बल दहा तास रेल्वे सेवा विस्कळीत झाल्या होत्या. बदलापूरकरांनी रेल्वे ट्रॅकवर उतरून या गोष्टीचा निषेध करून आरोपीला तातडीने फाशी द्यावी अशी मागणी कालच्या आंदोलनात करण्यात आली होती. तसेच या प्रकरणातील आरोपीला 24 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आता महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शनिवारी, 24 ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0