मुंबई

Who is Akshay Shinde : बदलापूर प्रकरणातील अटक आरोपी अक्षय शिंदेविरोधात न्यायालयाचा मोठा निर्णय, 24 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी

Who is Badlapur crime accused Akshay Shinde :  बदलापूर येथील एका शाळेत दोन विद्यार्थिनींचा लैंगिक छळ झाल्याची घटना समोर आली आहे. आरोपींवर कडक कारवाई करण्याच्या सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या आहेत.

बदलापूर :- बदलापूर प्रकरणातील अटकेत असलेला आरोपी अक्षय शिंदे Akshay Shinde याला आज न्यायालयात हजर करण्यात आले. सुनावणीअंती न्यायालयाने आरोपी शिंदेला 24 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

बदलापूर प्रकरणातील Badlapur School Rape Case आरोपी अक्षय शिंदे Akshay Shinde याला कल्याण न्यायालयात Kalyan High Court हजर करण्यात आले आहे. यावर लवकरच न्यायालयात सुनावणी होणार आहे. अटकेनंतर आरोपी शिंदेला पहिल्यांदा न्यायालयात हजर केले असता त्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. आज आरोपीची कोठडी संपल्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले.

बदलापूर येथील एका शाळेतील विद्यार्थिनीवर झालेल्या लैंगिक अत्याचारप्रकरणी काल घडलेल्या घटनेच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या सुमारे 300 जणांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी 40 हून अधिक जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0