Work from home ‘टास्क’च्या नावावर 9.50 लाखांची फसवणूक ; काशिगांव पोलिसांची कामगिरी फसवणुकीतील रक्कम परत मिळवून देण्यास यश
Work From Home Scam News : व्हिडिओ लाईक केल्यास पैसे देण्याच्या नावावर मोठी रक्कम गुंतविणाऱ्यांची सायबर गुन्हेगार नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक ; सायबर पोलीसांची कारवाई पैसे परत मिळवून देण्यास यश
मिरा रोड :- व्हिडिओ लाईक Video Like केल्यास पैसे देण्याच्या नावावर मोठी रक्कम गुंतविणाऱ्यांची सायबर गुन्हेगार नागरिकांची लाखो रुपयांनी फसवणूक करीत आहेत. वर्क फ्रॉम होम च्या नावाखाली फसवणूक Work From Home Scam करण्यात आलेली रक्कम 9.50 लाख परत करण्यास पोलिसांना यश आले आहे. Mira Bhayandar Latest Crime News
मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या काशिगांव पोलीस ठाण्याच्या Kashigaon Police Station परिसरात राहणारे विधी कांचा ( 35 वर्ष,रा.मिरा रोड, पूर्व) यांना वर्क फ्रॉम यांच्या नावाखाली ऑनलाइन यूट्यूब व्हिडिओ लाईक स्टास्क, ऑनलाइन हॉटेल मुव्ही रेटिंग यांना लाईक अथवा गुंतवणूक केल्यास अधिक नफा मिळवण्याचे आमिष दाखविले होते. यामध्ये गुंतवलेले 15 लाख रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार काशीगांव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी अज्ञात आरोपीच्या विरोधात भादवि कलम 420,34 सह माहिती तंत्रज्ञान अधिनियमन कलम 66 (सी), 66 (डी) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. Mira Bhayandar Latest Crime News
सायबर विभागाने तक्रारदार या महिलेचे तक्रारीवरून तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे फसवणुकीतील रक्कम वेगवेगळ्या बँकेच्या खात्यावर सायबर भामट्यांनी वळती केली होती. सायबर विभागाने ही सर्व रक्कम गोठविण्यात आली होती. या रकमेबाबत संबंधित बँक व न्यायालयाची पत्रव्यवहार करून न्यायालयाकडून फिर्यादी महिला विधी कांचा यांच्या फसवणुकीतील 9.50 लाख रक्कम परत मिळून देण्यास पोलिसांना यश आले आहे. Mira Bhayandar Latest Crime News
पोलीस पथक
प्रकाश गायकवाड, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-1, मिरारोड, विजयकुमार मराठे, सहाय्यक पोलीस आयुक्त, मिरारोड विभाग यांचे मार्गदर्शनाखाली राहुलकुमार पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक राहुल सोनवणे, पोलीस हवालदार सचिन पाटील यांनी पार पाडली आहे. Mira Bhayandar Latest Crime News