Mira Road Crime News : मनी ट्रान्सफर करणाऱ्या दुकानदाराची फसवणूक
•Mira Road Money Transfer Scam मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेची कामगिरी, फसवणूक करणाऱ्या आरोपीला अटक, आरोपीचे चार गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांनी यश
मिरा रोड :- मनी ट्रान्सफर करणाऱ्या दुकानदाराची फसवणूक झाल्याची काशिगांव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. रोख रक्कम बँक खात्यावर ट्रान्सफर करण्यास सांगून पैसे ट्रान्सफर झाल्यानंतर रक्कम ऍक्टिवा गाडीमध्ये विसरल्याचे सांगत पैसे घेऊन येतो असे सांगून पैसे न देताच तो व्यक्तीने तिथून पळ काढला होता. घडलेल्या घटनेबाबत फिर्यादी याने काशीगांव पोलीस ठाण्यात आरोपीच्या विरोधात भारतीय न्याय संहिता अधिनियमन कलम 318(4) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाने एका आरोपीला अटक केली असून पोलिसांनी आरोपीचे चार गुन्हे उघडकीस आणले आहे.
पोलीस उप आयुक्त (गुन्हे) यांनी आयुक्तालयाच्या हद्दीतील फसवणुकीबाबत घडलेल्या गुन्हे उघडकीस आणण्याकरिता पोलिसांना सूचना देण्यात आल्या होत्या. मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक राहुल राख यांच्या पथकाने पोलीस उपनिरीक्षक हिंतेंद्र विचारे, सहाय्यक फौजदार मनोहर तावरे, पोलीस हवालदार संग्राम गायकवाड यांनी गुन्ह्यातील आरोपीचे तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळवली होती. आरोपी हा तिवारी कॉलेजच्या पाठीमागील (मिरा रोड पूर्व ) सार्वजनिक रोडवर येणार असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले त्याचे नाव विचारले असता त्यांनी आपले नाव यासीन मोहम्मद युनूस शेख (20 वर्ष रा. मिरा रोड पूर्व) असे सांगितले होते. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून आरोपीकडून सखोल चौकशी केली असता मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत चार पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपीला चौकशीकरिता काशिगांव पोलीस ठाणे यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
पोलीस पथक
पोलीस उप आयुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) मदन बल्लाळ यांचे मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक राहुल राख, पोलीस निरीक्षक धनंजय पोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन बेन्द्रे, दत्तात्रय सरक, पोलीस उपनिरीक्षक हितेंन्द्र विचारे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्रीमंत जेधे, मनोहर तावरे, आसीफ मुल्ला, पोहवा, संग्राम गायकवाड, राजाराम काळे, हनुमंत सुर्यवंशी, संतोष मदने, शिवाजी पाटील, गोविंद केंद्रे, सतिष जगताप, राजविर संधु, प्रविणराज पवार, महेश वेल्हे, अनिल नागरे, पोशि. अखिल सुतार, नितीन राठोड, साकेत माघाडे, अंगद मुळे, मसुब सचीन चौधरी, सफौ. संतोष चव्हाण सर्व नेमणुक मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखा यांनी यशस्वी कामगिरी केलेली आहे.