Mumbai Weather Update: मुंबईत आज मुसळधार पावसाचा इशारा, विदर्भात विजांच्या कडकडाटाचा इशारा
Mumbai Weather Update News : गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने मारलेले दांडी नंतर, मुंबईसह राज्यात मुसळधार पावसाची होण्याची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
मुंबई :- मुंबईत मंगळवारी (20 ऑगस्ट) सकाळपासून अधूनमधून पाऊस पडत आहे. Mumbai Rain पुढील काही दिवस मुंबईत अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पुढील तीन ते चार दिवस उर्वरित महाराष्ट्रात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, काही ठिकाणी वादळी वारेही वाहत आहेत. Mumbai Weather Latest News
हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील तीन ते चार दिवस संपूर्ण राज्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज आणि उद्या कोकणात सर्वत्र वादळी वारे वाहतील आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे, तर या वेळी ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहतील. Mumbai Weather Latest News
मराठवाड्यातही काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. अनेक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे. विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. Mumbai Weather Latest News
मुंबईत सकाळी 26.99 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. पावसामुळे कमाल तापमानात घट होणार असून कमाल तापमान 28.87 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. काल मुंबईत 27.5 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. मुंबईतील AQI पातळी समाधानकारक आढळली आहे. येथे AQI 131 आहे. Mumbai Weather Latest News