Mira Road Crime News : भाईंदर अनैतिक मानवी वाहतूक पोलिसांची मोठी कारवाई ; 5 बांगलादेशी महिलांना अटक
•मिरा रोड आणि नया नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनैतिक मानवी प्रतिबंधक पोलिसांची धडक कारवाई, हे कायदेशीर वास्तव्य करणाऱ्या पाच बांगलादेशी महिलांना अटक
मिरा रोड :- मिरा रोड आणि नया नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदेशीर रित्या वास्तव्य करणाऱ्या पाच बांगलादेशी महिलांना अनैतिक मानवी प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांची मोठी कारवाई करत अटक केली आहे. या पाचही महिला भारतात विनापरवाना प्रवेश करून वास्तव्य करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी कारवाई करत या पाचही महिलांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष भाईंदर यांना मिळालेल्या गोपनीय बातमीदारामार्फत एव्हरशाईन वुड बिल्डींगच्या पाठीमागील झोपडपट्टी, बेवर्ली पार्करोड, तसेच न्यु मिरा पॅराडाईस बिल्डींगचे पाठीमागील झोपडपट्टी, गितानगर, या ठिकाणी बांगलादेशी नागरीक वास्तव्यास आहेत. जैन मंदीर, अंबर स्विट मार्ट जवळ मिरारोड पुर्व या ठिकाणी कामासाठी बांगलादेशी नागरीक येतात अशी बातमी मिळाली असून ते विनापरवाना राहत असल्याची माहिती मिळाली होती.पोलीस पथक, पंच व दुभाषिक यांचेसह साफळा रचुन एव्हरशाईन बुड बिल्डींगच्या पाठीमागील झोपडपट्टी, बेवर्ली पार्करोड, तसेच न्यु मिरा पॅराडाईस बिल्डींगचे पाठीमागील झोपडपट्टी, गितानगर, तसेच जैन मंदीर, अंबर स्विट मार्ट जवळ मिरारोड पुर्व या ठिकाणी बांगलादेशी नागरीक विनापरवाना राहत असल्याची तसेच कामासाठी येत असल्याची माहिती मिळाल्याने कायदेशीर बाबींची पुर्तता करुन दोन पंचासमक्ष छापा टाकुन 05 बांगलादेशी महिलाना ताब्यात घेवुन त्यांचेकडे केलेल्या चौकशीत ते बांगलादेशी नागरीक असल्याची कबुली दिल्याने बाबत दोन पंचासमक्ष सविस्तर पंचनामा करुन ताब्यात घेवून बांगलादेशी नागरीकांविरुध्द सरकार तर्फे मिरारोड व नयानगर पोलीस ठाण्यात सरकारतर्फे फिर्याद दाखल करुन मिरारोड पोलीस ठाणे आणि नयानगर पोलीस ठाणे येथे पासपोर्ट (भारतात प्रवेश) अधिनियम 1920 चे कलम 3,4 सह विदेशी व्यक्ती अधिनियम 1946 चे कलम 13,14-अ (ब) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलीस पथक
अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), मदन बल्लाळ, सहायक पोलीस आयुक्त, (गुन्हे) मिरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय यांचे मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष-भाईंदर पथकाचे पोलीस निरीक्षक समीर अहिरराव, सहाय्यक फौजदार उमेश पाटील, रामचंद्र पाटील, शिवाजी पाटील, पोलीस हवालदार किशोर पाटील, पोलीस शिपाई केशव शिंदे,चेतनसिंग राजपुत महिला पोलीस शिपाई अश्विनी भिलारे, शितल जाधव, सम्राट गावडे सर्व नेमणुक-अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष, भाईंदर यांनी केली आहे.