Earthquake in Palghar: पालघरमध्ये भूकंपाचे धक्के, तीव्रता रिश्टर स्केलवर 3.3 मोजली गेली
Earthquake in Palghar: पालघर परिसरात शनिवारी भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 3.3 इतकी मोजली गेली आहे.
पालघर :- शनिवारी (17 ऑगस्ट) पालघर परिसरात भूकंपाचे Earthquake in Palghar धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.3 इतकी मोजण्यात आली आहे. भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर लोक घाबरून घराबाहेर पडले. सध्या भूकंपामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
यापूर्वी जिल्ह्यात अनेकदा भूकंपाचे धक्के जाणवले. तथापि, कमी तीव्रतेमुळे अद्याप कोणतेही नुकसान झालेले नाही. जुलै महिन्यातही , मराठवाडा जिल्ह्यातील हिंगोली, परभणी व नांदेड या तीन जिल्ह्यांमध्ये तर विदर्भातील वाशीम या एका जिल्ह्यात हे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. मराठवाड्यातील व विदर्भातील झालेल्या या भूकंपाच्या धक्क्यांमुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही.या धक्कादायक घटनेमुळे भूकंपाच्या धक्क्यांमुळे काही वेळेसाठी लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.5 इतकी मोजण्यात आली आहे. भूकंपानंतर लोक घराबाहेर पडले. मात्र कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही.