Dombivli Crime News : टेड्रिंग फसवणूक ; ऑनलाइन टेड्रिंग च्या नादात महिलेने जवळपास 26 लाख गमाविले
•Dombivli Online Trading Scam News वेन्चुरा सिक्युरिटी आणि कोटक सिक्युरिटी ग्रुपमध्ये ॲड करून गुंतवणूक करण्यास सांगून फसवणूक
डोंबिवली :- ऑनलाईन माध्यमातून शेअर बाजारात गुंतवणूक केली तर तुम्हाला अल्पावधीत दामदुप्पट परतावा मिळेल. असे खोटे स्वप्न दाखवून फसवणूक करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशीच एक घटना विष्णूनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. ठाकूरवाडी डोंबिवली पश्चिम येथे राहणारे एका महिलेची जवळपास 26 लाख रुपयाची आर्थिक फसवणूक झाली आहे.वेन्चुरा सिक्युरिटी आणि कोटक सिक्युरिटी व्हाट्सअप ग्रुपमध्ये ॲड करून गुंतवणूक करण्यास सांगितले होते.त्यानंतर महिलेची तब्बल 25 लाख 84 हजार 230 रुपयांची फसवणूक झाली आहे. त्यासंदर्भात महिलेने विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
विष्णुनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाकूरवाडी डोंबिवली पश्चिम परिसरात राहणाऱ्या एका 38 वर्षीय महिलेने मागील तीन महिन्यापासून टेड्रिंगकरिता लाखो रुपये गुंतवले होते. महिलेला वेन्चुरा सिक्युरिटी आणि कोटक सिक्युरिटी व्हाट्सअप ग्रुपमध्ये ॲड करण्यात आले तसेच ग्रुपमध्ये टेड्रिंग कसे करायचे आयपीओ कसा विकत घ्यायचा याबाबत माहिती दिली होती. आरोपींनी महिलेचा विश्वास संपादन करून टेड्रिंग करीत एकूण 25 लाख 84 हजार 230 रुपये आरोपीने आपल्या बँक खात्यावर ऑनलाईन पाठवण्यास सांगितले. काही कालावधीतच त्या रक्कमेबद्दल अधिक नफा मिळवून देईल असे आश्वासन दिले होते.परंतु अनेक कालावधी गेला तरी कोणताही मोबदला किंवा गुंतवलेले पैसे न मिळाल्याने आपली आर्थिक फसवणूक झाली आहे असे त्या महिलेचे लक्षात आले. महिलेने घडलेल्या घटनेबाबत डोंबिवलीच्या विष्णू नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीच्या विरोधात भादवि 2000 चे कलम 66 (ड) 66 (क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) गमे करत आहे.