Dombivli Drugs News : 12.48 लाखांचा 2.41 किलो चरस जप्त ; गुन्हे शाखा कक्ष-3, कल्याण यांची कारवाई
•Drugs Are Seized By Police In Dombivli चरस विक्रीसाठी आलेल्या उत्तर प्रदेश मधील आरोपीचा पर्दाफाश, मित्राच्या घरी 1.23 किलोचा चरस, दोन मोबाईल फोन जप्त, बबलू भाईचा शोध
डोंबिवली :- उत्तर प्रदेश राज्यातून डोंबिवलीत चरस विक्रीसाठी आलेल्या एकाला गुन्हे शाखा कक्ष-3 कल्याण युनिट यांनी अटक केली आहे. तसेच आरोपीकडून दोन किलो 41 ग्रॅम वजनाचा चरस अंमली पदार्थ ज्याची किंमत बारा लाख 48 हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. तसेच आरोपीकडून पोलिसांनी दोन मोबाईल चरस ही जप्त केला आहे. मित्राच्या खोलीवर आरोपीने 1.23 ग्रॅम चरस अंमली पदार्थ ठेवल्याचे पोलिसांना कबुली दिली आहे. तर हा चरस उत्तर प्रदेश मधील बबलू भाई यांच्याकडून विक्रीसाठी आणल्याचे आरोपींनी कबुली केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखा कक्ष- 3, कल्याण युनिटचे पोलीस हवालदार प्रशांत सदानंद वानखडे यांच्या गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीच्या आधारे डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकाजवळच्या कॅनरा बँकेच्या समोर डोंबिवली येथे एक व्यक्ती चरस अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती दिली होती. पोलिसांनी सापळा रचून आरोपीला अटक केली आहे. जुनैद शिबली अली (30 वर्ष) (राह स्वतःचे घर, मोहन बेहरा गाव, महिनाम बाजार, अधलोआम जि. दरभंगा राज्य बिहार) त्याला अटक केली. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून एक किलो 18 ग्रॅम वजनाचा चरस अंमली पदार्थ आणि दोन मोबाईल फोन जप्त केले आहे. त्याच्या विरोधात डोंबिवली पोलीस ठाण्यात एनडीपीसी कायदाअंतर्गत 1985 कलम 8 (क),20(क),29 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला न्यायालयासमोर हजर केले असता त्याला पोलीस कस्टडी सुनाविण्यात आली आहे.
पोलिसांनी अधिक तपास केला तेव्हा आरोपीने पोलिसांना सांगितले की, त्यांनी हा चरस अमली पदार्थ उत्तर प्रदेश मधील पंचरण येथे राहणाऱ्या बबलू भाई याच्याकडून विक्रीसाठी घेतल्याचे सांगितले आहे. मित्र सैराट उर्फ राहुल अण्णा राहिले (रा. शेलार नाका डोंबिवली पुर्व) एक किलो 23 ग्रॅम वजनाचा चरस अंमली पदार्थ विक्री केल्याचे सांगितले आहे.अटक आरोपी जुनैद शिबली अली याचेकडुन एकुण रू.12 लाख 48 किमतीचे 2 किलो 41 ग्रॅम चरस किंमतीचे दोन मोबाईल मुदद्देमाल जप्त केला आहे.
पोलीस पथक
आशुतोष डुंबरे, पोलीस आयुक्त, ठाणे शहर, पंजाबराव उगले, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, शिवराज पाटील, पोलीस उप आयुक्त, गुन्हे शेखर बागडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, (शोध १) गुन्हे ठाणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष उगलमुगले,संदिप चव्हाण, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दत्ताराम भोसले, पोलीस हवालदार विश्वास माने,बालाजी शिंदे,विलास कडु,अनुष कामत, प्रंशात वानखेडे, पोलीस हवालदार गोरखनाथ पोटे, पोलीस नाईक दिपक महाजन, पोलीस शिपाई जालिंदर साळुंखे,गुरूनाथ जरग,मिथुन राठोड,विजेंद्र नवसारे, विनोद चन्ने, गोरक्ष शेकडे यांनी केलेली आहे.