Maharashtra Cricket Association : शरद पवार यांच्या हस्ते महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या नवीन लोगोचे अनावरण
Maharashtra Cricket Association News : आशिष शेलार, रोहित पवार क्रिकेटर ऋतुराज गायकवाड माजी क्रिकेटर चंदू बोर्डे यांच्या उपस्थितीत लोगोच्या अनावरण
पुणे :- राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार Sharad Pawar गटाचे प्रमुख शरद पवार यांनी काल (13 ऑगस्ट) महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या Maharashtra Cricket Association नवीन लोगोच्या अनावरण केले आहे. या लोगो मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमा Maharashtra Cricket Association LOGO पाहायला मिळत आहे. या सोहळ्याला प्रमुख उपस्थिती म्हणून शरद पवार हे तर होते भाजपचे नेते आशिष शेलार Ashish Shelar आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार हेही कार्यक्रमाला उपस्थित होते. तसेच यावेळी माझी क्रिकेटर चंदू बोर्डे, भारतीय संघाचा खेळाडू ऋतुराज गायकवाड Ruturaj Gaikwad तसेच महाराष्ट्राचे आजी-माजी खेळाडू तसेच एम सी ए चे आजी-माजी पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि आमदार रोहित पवार यांनी या कार्यक्रमाची झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्यांनी पोस्टच्या माध्यमातून म्हटले की, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या पुण्यात सुरु करण्यात आलेल्या नवीन ऑफिसचे उद्घाटन आणि MCA च्या नवीन लोगोचे अनावरण ज्येष्ठ नेते आणि ICC चे माजी अध्यक्ष पवार साहेब आणि BCCI चे खजिनदार आशिष शेलार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ॲपेक्स बॉडी सदस्य, माजी क्रिकेटर चंदू बोर्डे सर, ऋतुराज गायकवाडसह आजी-माजी खेळाडूंची उपस्थिती होती.
आशिष शेलार म्हणाले की, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मोदीबाग पुणे येथील कार्यालय उद्घाटन आणि बोधचिन्हाच्या अनावरण सोहळ्याला बीसीसीआय आणि आयसीसीचे माजी अध्यक्ष शरद पवार, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहित पवार आणि बीसीसीआयचा खजिनदार म्हणून मी उपस्थितीत राहिलो. यावेळी ॲपेक्स कमिटीच्या सदस्य, खेळाडू, प्रशिक्षक आणि क्रिकेटप्रेमींना शुभेच्छा दिल्या.