मुंबई

Rohit Pawar : अजित पवार यांच्या वक्तव्यावर पुतणा रोहित पवार यांच्याकडून निशाणा

Rohit Pawar Tweet’s On Ajit Pawar दिल्लीत बसलेल्या गुजरातच्या नेत्यांचा…. रोहित पवार यांचे ट्विट

मुंबई :- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वृत्तवाहिनीला मुलाखती दरम्यान सुप्रिया सुळे यांच्या बद्दल केलेल्या वक्तव्यावर आता पुतणा रोहित पवार यांनी जोरदार निशाणा साधला आहे. दिल्लीत बसलेल्या गुजरातच्या नेत्यांचा दबाव असल्याचा रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हणाले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते रोहित पवारांचे ट्विट
आदरणीय दादा,

खा. सुप्रियाताईंच्या विरोधात सुनेत्रा काकींना उमेदवारी देण्याचा निर्णय दादांचा असूच शकत नाही अशी खात्री होती. ती चूक होती म्हणून एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत त्याची तुम्ही कबुली दिली, परंतु तुमचे मित्रपक्ष मात्र उलट प्रचार करत हा दादांचाच निर्णय असल्याचे सांगतात. याला तुम्ही ‘चूक झाल्याचे नाव देत असलात’ तरी प्रत्यक्षात हा दिल्लीत बसलेल्या गुजरातच्या नेत्यांचा दबाव होता. आता विधानसभेला ‘असाच दबाव माझ्या मतदारसंघाच्या बाबतीत आपल्यावर असल्याची’ चर्चा आहे.

दबावाला बळी पडणे हा वैयक्तिक विषय असला तरी स्वाभिमान,विचारधारा आणि साहेबांना सोडून तुम्ही भाजपचं मांडलिकत्व स्वीकारलं आणि यामध्ये एक क्षमता असलेला नेता बळीचा बकरा ठरला, याचं मात्र पक्षाचा एक कार्यकर्ता आणि एक पुतण्या म्हणून कायम दुःख राहील. पण ही कटकारस्थाने करणाऱ्या तसंच महाराष्ट्र नासवणाऱ्या कलाकाराला मात्र महाराष्ट्राच्या स्वाभिमानी जनतेच्या सहकार्याने राज्याच्या राजकीय पटलावरून एक दिवस नक्की बाजूला सारेल, हा माझा तुम्हाला पक्का वादा आहे.

अजित पवारांचे वक्तव्य काय?

लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघातून बहीण सुप्रिया सुळे यांच्याविरोधात माझी पत्नी सुनेत्रा पवारांना उभे करणे ही मोठी चूक होती, अशी कबुली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका मुलाखतीत दिली.मुलाखतीत हा प्रश्न विचारण्यात आला असता अजित पवार म्हणाले, ‘अनेक घरांमध्ये राजकारण आहे. पण हे राजकारण कधीच घरामध्ये शिरू द्यायचे नसते. पण त्याबाबतीत माझ्याकडून काहीशी चूक झाली. मात्र, सुनेत्रा यांना उभे करण्याचा निर्णय एकट्याचा नव्हे तर राष्ट्रवादीच्या संसदीय कमिटीचा होता, त्यामुळे तो मान्य करावा लागला. एकदा बाण सुटला की आपण काहीच करू शकत नाही. पण आज माझे मन मला हे सांगत आहे. तसे व्हायला नको होते,’ असेही पवार म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0