Pune Police News : पुणे पोलिसांनी दिले रॅगिंग विरोधी धडे…
Pune Police News : कोंढवा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश जाधव यांनी अँटी रॅगिंग, सायबर सिक्युरिटी, महिला सुरक्षितता या संदर्भात व्ही.आय.टी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
पुणे :- महाविद्यालयात होणाऱ्या Pune College News गेल्या काही वर्षांपासून रॅगिंग Ragging News संस्कृती उदयास आली. एखाद्या विद्यार्थ्याला किंवा विद्यार्थिनींना महाविद्यालयीन जीवनात अनैसर्गिक रित्या मानसिक त्रास देणे आणि त्यांच्या या त्रासाला कंटाळून अनेक विद्यार्थी हे आत्महत्या करत असतात असे अनेक प्रकार अनेक वर्षांपासून रॅगिंग मुळे झाल्याचे आपल्या सर्वांना कल्पना आहे. रॅगिंग विरोधात कोंढवा पोलीस ठाण्याचे Kondhwa Police Station सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश जाधव यांनी VIT महाविद्यालयात VIT College मार्गदर्शन केले. रॅगिंग मुळे अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याचे पोलिसांनी मार्गदर्शन करताना सांगितले आहे. Pune Police Latest News
सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश जाधव यांनी व्ही.आय.टी महाविद्यालय कोंढवा बुद्रुक या ठिकाणी मार्गदर्शन करताना अँटी रॅगिंग सोबतच अमली पदार्थाचे सेवनामुळे होणारे दुष्परिणाम तसेच सोशल मीडियाचा वाढता प्रादुर्भाव आणि त्याचा वापरामुळे महिला सुरक्षितता सायबर सिक्युरिटी इत्यादी महत्त्वाच्या विषयांबाबतही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील मोठा विद्यार्थी वर्ग इथे उपस्थित होता. विद्यार्थ्यांसह शिक्षकही मोठ्या संख्येने तो उपस्थित होऊन या कार्यक्रमाला पोलिसांनी केलेल्या मार्गदर्शनानंतर विद्यार्थ्यांमध्ये नक्कीच परिवर्तन होईल असा विश्वास महाविद्यालयाचे प्राचार्य पाटील यांनी व्यक्त केला आहे. तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंढवा पोलीस ठाणे विनय पाटणकर यांच्या संकल्पनेतून ही मोहीम कोंढवा पोलीस ठाण्याच्या सर्वच महाविद्यालय आणि शाळेत यापुढेही चालू राहणार असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश जाधव यांनी सांगितले आहे. Pune Police Latest News