क्राईम न्यूजमहाराष्ट्र

Fake Currency News : वाशिमच्या मंगरुळपीर येथील घटना ; बनावट नोटा छापणाऱ्या चौघांना अटक

Washim Police Busted Fake Currency : वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर येथे पाचशे रुपयाचे बनावट नोटा छापणाऱ्या 4 जणांना पोलिसांनी अटक केली आहे

वाशिम :- वाशिमध्ये बनावट Washim Fake Currency नोटा छापणाऱ्या 4 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. मंगरुळपीर पोलिसांनी आरोपींकडून बनावट नोटा छापण्याचे साहित्य देखील जप्त केले आहे. वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर येथे ही घटना घडली आहे. सर्व आरोपी नांदेड येथून कारमधून येत होते. अशी गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी नाकाबंदीमध्ये चार आरोपींना अटक केली असून त्यांच्या कारची झडती घेतली असता पोलिसांना त्यांच्याकडे 16 नोटाच्या आकाराचे कापलेले बंडल पोलिसांना आढळून आले होते. पोलिसांनी कार मधील तीन व्यक्तींना अटक केली असून तर उर्वरित एका ओरापीला नांदेडमधून अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगरुळपीर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नांदेड येथून बनावट नोटांचा व्यवसाय करणारे तिघेजण कारमधून येत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे नाकाबंदी करण्यात आली आणि सर्व गाड्यांची तपासणी सुरु करण्यात आली. यावेळी एक गाडी समोरून येत होती, त्या गाडीला अडवण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला परंतु गाडी थांबली नाही. यानंतर पोलिसांनी त्या गाडीचा पाठलाग सुरू केला. त्यानंतर आरोपींनी गाडीचा वेग वाढवला आणि पळून जाण्याचा प्रयत्न सुरू केला. काही अंतर पार केल्यानंतर मंगरुळपीर पोलिसांनी गाडी थांबवून झडती घेतली.पोलिसांना कारमधून एका मोठ्या पिशवीत कागदाचे काही बंडल आणि द्रव असे पदार्थ आढळून आले. ज्याचा वापर खोट्या नोटा तयार करण्यासाठी केला जातो. यानंतर तिन्ही आरोपींना मंगरुळपीर पोलिसांनी ताब्यात घेतलं. चौकशीत हे तिन्ही आरोपी एक लाख रुपयांच्या बनावट नोटा बनवण्याचे साहित्य खरेदी करत असल्याचे समोर आलं. आरोपींकडे चौकशी केली असता त्यांनी प्रथम बॅगेबाबत अस्पष्ट उत्तरे दिली. पोलिसांनी आरोपींकडून एक लाख 78 हजार 950 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. चारही आरोपींच्या विरोधात मंगरुळपीर पोलीसांनी ताब्यात घेतली असून त्यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

अटक आरोपींची नावे

1) शिवाजी साहेबराव खराडे (53 वर्ष रा शिवाजी नगर कारंजा)

2) शेख जावेद शेख लालन (44 वर्ष रा मस्जीदपुरा कारंजा)

3) शेर खान मेहबुब खान (46 वर्ष रा मोती मस्जीद काझीपूरा कारंजा)

4)नसरुल्ला खान अजीज खान उर्फ हाजी साब (रा नांदेड)

पोलीस पथक
अनुज तारे पोलीस अधीक्षक वाशिम, भारत तांगडे अपर पोलीस अधीक्षक वाशिम, निलीमा आरज उपविभागिय पोलीस अधीकारी मंगरुळपीर, पोलीस निरीक्षक सुधाकर आढे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवचरण डोंगरे, पोलीस उपनिरीक्षक दिनकर राठोड, पोलीस उपनिरीक्षक राम ढगे, महिला पोलीस हवालदार संजय घाटोळे, पोलीस हवालदार जितेंद्र ठाकरे, माळकर,रफीक,येळणे, उमेश ठाकरे यांनी पार पाडली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0